Friday, December 8, 2023

रणबीर कपूरने सांगितले बॉलीवूडचे ‘सत्य’; म्हणाला, ‘फिल्म इंडस्ट्रीत आता…’

सध्या रणबीर कपूर त्याच्या ‘तू झुठी मैं मक्कार‘ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो अनेक इवेंट आणि शाेमध्ये हजेरी लावत आहे. अशात तो ‘तू झुठी मैं मक्कर’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत त्याची को-स्टार श्रद्धा कपूरही दिसली. शो दरम्यान, रणबीरने खूप मजा केली आणि त्याच्या लहानपणीच्या गोष्टींही सांगितले. यासोबतच त्यांनी बॉलीवूडमधील बदलत्या काळ आणि आपुलकीबद्दलही सांगितले. काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेऊया…

खरं तर, सध्या रणबीर कपूर (ranbir kapoor) याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच त्याचा ‘द कपिल शर्मा शो’चा एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओध्ये अभिनेता बॉलिवूडमधील आपुलकी आणि एकतेबद्दल बोलताना दिसत आहे. रणबीर म्हणाला की, “या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कदाचित पहिले सारखी आपुलकी राहिलेली नाही, जिथे प्रत्येकजण सण किंवा कोणत्याही चित्रपटाचा आनंद एकत्र साजरा करत असे. त्यामुळे मला वाटते की, आजकाल ती वेळ गेली आहे, जेव्हा तुम्ही चित्रपटसृष्टीत एकमेकांना साथ देत असत. त्यामुळे मी तो वेळ खूप मिस करतो.”

रणबीरच्या या बोलण्यावर कपिल शर्मा म्हणाला की, “तू अगदी बरोबर बोलला आहेस.” अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक रणबीर कपूरचे कौतुक करत आहेत. अनेक साेशल मीडिया युजर्स या विषयावर भरपूर चर्चा करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘रणबीर कपूर अगदी बरोबर आहे, फिल्म इंडस्ट्री पूर्वीसारखी एकजूट नाही. ते म्हणजे निर्माता आणि दिग्दर्शकामुळे.’ तर, दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘यश चोप्रांच्या वीर-झारा चित्रपटाच्या वेळी आम्ही बॉलिवूडमध्ये शेवटची एकता पाहिली. त्यादरम्यान चित्रपटातील कलाकारांनी त्यांना खूप साथ दिली.’ अशा प्रकरे युजर्स भिन्नभिन्न कमेंट करुन आपले मत मांडत आहे.(bollywood actor ranbir kapoor in the kapil sharma show actor talk about now film industry do not support each other)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वराच्या लग्नावर महंत राजू दास यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘ज्या समाजात संबंध प्रस्थापित…’
नवाजुद्दीन सिद्धीकीच्या नोकरणीने साक्ष बदलवताच भावाने साधला निशाणा म्हणाला, ‘अजून कितींना विकत घेणार?’

हे देखील वाचा