हाहाहा! मराठमोळ्या रितेश देशमुखने शेअर केला पांडाचा मजेशीर व्हिडिओ, डान्स पाहून तुम्हीही खदखदून हसाल

Bollywood Actor Riteish Deshmukh Shares Funny Video of Panda Dance Watch


बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने वेड लावणारा अभिनेता म्हणजेच ‘रितेश देशमुख’ होय. रितेशने आज आपल्या कारकीर्दीचे शिखर गाठले आहे. प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. इतर अभिनेत्यांप्रमाणे रितेशलाही सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची आवड आहे. तोदेखील आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतेच अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यातील एक व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. तुम्हीही तो व्हिडिओ पाहून खदखदून हसाल.

रितेशने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पांडाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबतच ‘हाऊसफुल ३’ गाणेही वाजत आहे.

विशेष म्हणजे या व्हिडिओत पांडा आपला एक पाय वर उचलताना दिसत आहे. यासोबत ‘आजा करें गोविंदा का डान्स, टांग उठा के’ असे बोल असलेले मिळते- जुळते गाणे वाजत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत रितेशने लिहिले की, “मास्क लावायला विसरू नका. कोरोना अद्याप इथेच आहे. बुलबुल पांडा.”

यापूर्वीही रितेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो आपली पत्नी जेनेलिया देशमुखसोबत दिसत आहे. या व्हिडिओत ते स्विमिंग पूलशेजारी उभे होऊन ‘टोटल धमाल’ चित्रपटातील ‘पैसा ये पैसा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

रितेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो सुपरस्टार अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी तो ‘बागी ३’ या चित्रपटात टायगर श्रॉफच्या भावाच्या भूमिकेत दिसला होता.

रितेशने आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यामध्ये ‘माऊली’, ‘लय भारी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘हाऊसफुल’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’, ‘बँक चोर’, ‘डबल धमाल’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कष्टाला पर्याय नाही’, पण काम मिळण्यासाठी हवे बक्कळ फॉलोअर्स; असे आम्ही नाही तर सांगतेय ‘ही’ अभिनेत्री

-मूर्ती लहान पण कीर्ती महान! वयाच्या चौथ्या वर्षी बनला होता ‘डीजे’, पाहा व्हायरल होणारा आर्चचा व्हिडिओ

-तापसी पन्नूचं ‘आयटम साँग’ पाहिलंय का? व्यंकटेशच्या चित्रपटात दिसली होती बोल्ड रूपात, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.