Thursday, April 18, 2024

ईदला गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर येऊन भाईजानने दाखवला आपला स्वॅग, अभिनेत्याला पाहून चाहते थक्क

देशात आणि जगभरात आज ईदचा सण साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण हा दिवस खास पद्धतीने साजरा करत आहे. सेलिब्रिटीही सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देत आहेत. या खास प्रसंगी सलमान खाननेही त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने त्याच्या घराच्या बाहेर येऊन चाहत्यांना त्याची झलक दाखवली, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

आज म्हणजेच ईदच्या आनंदाच्या दिवशी, सलमान खान (salman khan) याचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय पलक तिवारी, शहनाज गिल, राघव जुयाल, भूमिका चावला आणि पूजा हेगडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला समीक्षकांनीही संमिश्र प्रतिसाद दिला आहे. यासाेबतच पहिल्या दिवशीच कमाईच्या बाबतीत सलमानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल केली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ईदच्या मुहूर्तावर सलमान खानने मुंबईतील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांना आपली एक झलक दाखवली. यावेळी सलमान काळ्या पठाणी सूटमध्ये दिसला. अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी भाईजानला पाहून चाहतेही खूश झाले. सकाळपासूनच सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी होती. गॅलेक्सीबाहेर एवढा जमाव जमला होता की, पोलीसही घटनास्थळी हजर होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी का जान’ हा चित्रपट 5700 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. दुसरीकडे, भारताबद्दल बोलायचे झाले तर, याला 4500 स्क्रीन मिळाले आहेत. सलमान खानला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. मंडळी, ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटानंतर सलमान खान लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त कॅटरिना कॅफचीही महत्त्वाची भूमिका आहे.(bollywood actor salman khan greeting perfect eidi to his fans bhai jaan came outside his galaxy apartment)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्याचा फोन हिसकावून पळाली राखी सावंत, ‘ड्रामा क्वीन’चं ‘हे’ कृत्य पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर

…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा