Saturday, June 15, 2024

गर्दीत सलमानने दाखवला विक्कीला एटिट्यूड, बाॅडिगार्डने धक्का देत बाजूला केले अभिनेत्याला, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेता सलमान खान अन् विकी कौशल सध्या अबू धाबीमध्ये आयफा 2023मध्ये सहभागी होण्याची तयारी करत आहेत. त्याच्यासोबत या खास सोहळ्यात अनेक दिग्गज स्टार्सही उपस्थित राहणार आहेत. अशात आता आयफा 2023च्या पत्रकार परिषदेतून सलमान खान आणि विकी कौशलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिनाचा पती विकी कौशलकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे. हे पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

सलमान खान (salman khan) याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विकी कौशल चाहत्यांसोबत सेल्फी काढत आहे, त्याच दरम्यान सलमानचा ताफा तिथे पोहोचतो. सलमान अनेक बॉडीगार्ड्सह आत येत असताे दरम्यान, विकी बाजूला हाेताे आणि सलमानसाेबत हॅंडशेक करण्याचा प्रयत्न करताे. मात्र, सलमान खानन काही सेकंदांसाठी अभिनेत्याकडे दुर्लक्ष करताे आणि तेथून निघून जाताे.

व्हिडिओमध्ये विकीचे भाव स्पष्ट दिसत आहेत. अशा स्थितीत विकी दुसऱ्यांदा हॅंडशेक करण्याचा प्रयत्न करताे, पण यादरम्यान सलमान त्याला लूक देऊन निघून जाताे.

https://twitter.com/Freak4Salman/status/1661795949965094912?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1661795949965094912%7Ctwgr%5E270809c0641c11c9497c97b0b78fc4c82c32e676%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fsalman-khan-ignore-vicky-koushal-in-iifa-2023-in-abu-dhabi-video-gone-viral-2416820

व्हिडीओमध्ये सलमान विकीला ओळखू शकत नसल्याचे दिसत आहे. सलमान तिथून जात असताना त्याच्या बॉडीगार्ड्सनीही विकी कौशलला बाजूला ढकलले. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना वाटते की, विकीला सामान्य माणसाप्रमाणे वागवले गेले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच माेठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काही लोक सलमानची स्तुती करत आहेत, तर काही जण विकीसोबत असे वागल्याबद्दल त्याला फटकारत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘यार हा जीवे मारण्याच्या धमक्यांनी इतका घाबरला आहे की, त्याने अक्षरशः स्वतःला बॉडीगार्ड्सनी घेरले आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘जर हा विकी कौशल असेल, तर त्याला बाजूला का काढले, दोघेही एकमेकांना भेटू शकले असते.'(bollywood actor salman khan ignore vicky koushal in iifa 2023 in abu dhabi video gone viral )

हे देखील वाचा