बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या नवीन चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान‘मुळे सतत चर्चेत आहे. अशात अलीकडेच अभिनेता ‘द कपिल शर्मा‘ शाेमध्ये दिसला हाेता, जिथे त्याने त्याचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांच्या घटस्फोटाबद्दल विनोद केला. काय म्हणाला भाईजान? चला जाणून घेऊया…
कॉमेडी शोमध्ये कपिलने सलमानला विचारले की, ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये तीनही भाऊ मिळून तुला लग्नासाठी राजी करत असल्याचे दिसले आहे, ते पाहून अरबाज आणि सोहेलने असे नाही म्हणटले का? की, “आमचे तर हा ऐकत नाही. तुमचे काय ऐकणार?” की, हे पाहून त्यांनी तुम्हाला लग्न करायला सांगितले? यावर सलमानने तत्काळ मजेशीरपणे उत्तर दिले की, ‘तो पूर्वी माझे ऐकत नव्हता, पण आता तो माझे ऐकतो.’
खरे तर, सलमान खानचा संदर्भ अरबाज आणि सोहेलच्या लग्न आणि घटस्फोटाकडे होता. अरबाज खानने अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरासोबत 1998मध्ये लग्न केले. मात्र, 2017 मध्ये दाेघांचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव अरहान खान आहे. तर सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी 1998मध्ये लग्न केले. मात्र, दोघांनी गेल्या वर्षी घटस्फोटाची घोषणा केली होती.
सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाविषयी बाेलायचे झाले, तर अभिनेत्याने चित्रपटात एका अशा व्यक्तीची भूमिका साकारली, ज्याला त्याच्या भावांनी लग्न करण्यास सांगितले, परंतु तो फक्त त्याच्या भावांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातमध्ये मोठ्या कलाकारांचा समावेश असला तरी हा चित्रपट लोकांना फारसा आकर्षित करू शकला नाही. या चित्रपटात सलमानसोबत पूजा हेगडे, व्यंकटेश, जगपती बाबू, भूमिका चावला, पलक तिवारी, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.(bollywood actor salman khan makes jokes about brothers arbaaz khan sohail khan divorces in the kapil sharma show)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ओ…हो…! करण जोहर त्याच्या आगामी सिनेमात शाहरुख खान नाही तर ‘या’ सुपरस्टार अभिनेत्यासोबत करणार काम?
मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलियाने घातला एक लाख मोत्यांचा ड्रेस, जाणून घ्या ड्रेसेची विशेषता