Sunday, June 23, 2024

यामी गौतमला आपली नक्कल करताना पाहून पंगा क्वीन म्हणाली, “भेटल्यावर तू…”

टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या यामी गौतमने बॉलिवूडमध्ये देखील तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. चित्रपटांमध्ये देखील तिला चांगलेच यश मिळाले आहे. आज तिची गिनती देखील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. मोजक्या मात्र उत्तम चित्रपटांमध्ये काम करण्यात तिचा प्रयत्न असतो. आज यामीच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहे. अनेकांना तिचा अभिनय चांगलाच आवडतो, मात्र खूप लोकांना हे माहित नसेल की, अभिनयासोबतच यामी उत्तम मिमिक्री आर्टिस्ट देखील आहे.

नुकताच यामीचा ‘लॉस्ट’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. याआधी ती अभिषेक बच्चनसोबत ‘दसवी’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली. सध्या यामीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिची मिमिक्री कला दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये यामी कंगना रणौतची मिमिक्री करताना दिसत असून, हा व्हिडिओ एका चॅट शोचा असून हा व्हिडिओ यमीने इस्न्त स्टोरीवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये यामी कंगनाच्या आवाजात बोलताना म्हणते, “बघ बाबा माझी इच्छा आहे की, पुढचा सिनेमा आपण सोबत काम करू. मात्र जी स्क्रिप्ट आणि आणि भूमिका आहे ती चांगली असायला पाहिजे. करणार तुम्ही?” कंगनाच्या आवाजातला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून, या व्हिडिओवर खुद्द कंगनाने देखील यामीचे कौतुक केले आहे. तिने यामीला ‘नॉटी गर्ल’ म्हटले आहे. पुढे कंगनाने लिहिले, “पुढे जेव्हा आपण भेटू तेव्हा मी तुला हे माझ्यासमोर करायला लावेल.” तत्पूर्वी यामीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लॉस्ट’ हा सिनेमा चांगला असून, यात तिने एका पत्रकारांची भूमिका साकारली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तुम्हाला त्याचा राग येता कामा नये’ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकांना दाखवला आरसा

अनवाणी पायांनी ऑस्कर पुरस्कारासाठी रवाना झाला राम चरण, काय आहे कारण? घ्या जाणून…

हे देखील वाचा