Sunday, May 19, 2024

कॅटरिनाच्या ‘या’ चित्रपटासाठी विकीने दिले हाेते ऑडिशन, पण अभिनेत्याला करावा लागला नकाराचा सामना

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘जब तक है जान‘ या चित्रपटात शारिब हाश्मी ‘जैन मिर्झा’ची भूमिका साकारताना दिसला होता. अशात आता शारीब हाश्मीने खुलासा केला आहे की, त्याच्या आधी विक्की कौशलने या चित्रपटात ‘जैन’ची भूमिका साकारण्यासाठी ऑडिशन दिली होती, परंतु त्याला नकार देण्यात आला आणि त्यानंतर शरीबला ही भूमिका मिळाली.

अभिनेता विकी काैशल (vicky kaushal) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील सारा अली खानसोबतची त्याची जोडी लोकांना चांगलीच आवडली आहे. इतकेच नव्हे तर, चित्रपट बॉक्स ऑफिसवरही धमाल करत आहे. शारीब हाश्मी त्याच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात विकी कौशलसोबत सिक्योरिटी गार्डच्या भूमिकेत दिसला आहे.

अशात अलीकडेच माध्यमांशी बातचीत करताना शारीब हाश्मीने खुलासा केला की, यापूर्वी विकी कौशलने देखील जैन मिर्झाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होती, पण चित्रपटाच्या टीमला विकी कौशल ‘जैन’च्या भूमिकेसाठी योग्य वाटला नाही आणि त्याला नाकारण्यात आले. यश चोप्रा यांच्या बॅनरखाली बनलेला ‘जब तक है जान’ हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये शाहरुख खान, कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा यांसारखे अनेक स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले होते.

‘जरा हटके जरा बचके’ मधील शारीबच्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, तो या चित्रपटात सिक्योरिटी गार्डची भूमिका साकारताना दिसला आहे. अशात माध्यमाशी संवाद साधताना शरीबने सांगितले की, ‘जेव्हा त्याला चित्रपटात सिक्योरिटी गार्डच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, तेव्हा तो या भूमिकेबद्दल संकोच करत होता. कारण, चित्रपटात त्याची एन्ट्री मध्यांतरानंतर होणार होती. मात्र, तरी त्याने ही ऑफर स्वीकारली.'(bollywood actor shari hashmi revealed that vicky kaushal gave audition for katrina kaif film jab tak hai jaan )

अधिक वाचा:
नवाजुद्दीन अन् शहनाज गिलच्या नवीन गाण्याचे पोस्टर रिलीज, ‘या’ दिवशी येणार चाहत्यांच्या मनोरंजनासाठी
‘या’ कारणास्तव ‘हाऊसफुल्ल 3’नंतर अभिषेक बच्चनने घेतला ब्रेक; म्हणाला, ‘मी साइनिंग अमाउंट…’

हे देखील वाचा