काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केले. अशात आता हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. अशात काही दिवसांपुर्वी दोघेही सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जपानला गेले होते, ज्याचे फाेटाे सिद्धार्थने शेअर केले आहेत.
लग्नानंतर सिद्धार्थ (sidharth malhotra) आपल्या पतीची कर्तव्ये पार पाडण्यात मागे हटत नाही. एका सामान्य पतीप्रमाणे तोही कियाराचे नखरे उचलत आहेत. हे आम्ही म्हणत नसून अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट सांगत आहे. खरेतर सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ कॅमेऱ्याकडे पाठ करून उभा आहे. या सगळ्यात गंमत म्हणजे त्याच्या खांद्यावर एक, दोन नाही, तर तीन शॉपिंग बॅग लटकल्या आहेत. हा फोटो शेअर करत सिद्धार्थने लिहिले, ‘पतीचे कर्तव्य करत असताना एका वेळी एक बॅग @kiaraaliaadvani ‘
दुसऱ्या फोटोमध्ये सिद्धार्थ रेस्टॉरंटमध्ये बर्गर खाताना दिसत आहे. यासोबत सिद्धार्थने लिहिले, ‘बॅग टू वर्क मिळण्याआधी एक छोटा-सा बाइट. ट्रीटसाठी थॅंक यू @kiaraaliaadvani. या फोटोंमध्ये सिद्धार्थ खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून त्याने पांढरा टी-शर्ट आणि निळा जॉगर्स घातला आहे.
सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर तो शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो दिशा पटानीसोबत ‘योद्धा’ चित्रपटातही दिसणार आहे. दुसरीकडे, कियाराबद्दल बाेलायचे झाले, तर आजकाल कियारा तिचा आगामी चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’च्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहे. ‘भूल भुलैया 2’ नंतर कियारा पुन्हा एकदा कार्तिक आर्यनसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 29 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.(bollywood actor sidharth malhotra carried kiara advani shopping bags pictures post on his instagram story)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्याचे लिव्हरच्या गंभीर आजाराने निधन, उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव होती चालू
माेठी बातमी! कार्यक्रमाच्या आयाेजकांवर गुन्हा दाखल केल्याबाबत गाैतमी पाटीलचं माेठं वक्तव्य म्हणाली,’माझा दोष…’