Friday, April 19, 2024

आगामी चित्रपट ‘फतेह’मध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि सोनू सूद दिसणार एकत्र

बॉलीवूड दिवा जॅकलिन फर्नांडिस हिने अलीकडेच रिलीज झालेल्या ‘सर्कस‘ चित्रपटातील तिच्या सुंदर रेट्रो लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यामुळे अभिनेत्रीच्या अभिनयाचे आणि लूकचे खूप कौतुक झाले आहे. सर्कस चित्रपटातील जॅकलीनच्या लूकने चात्यांना भुरळ घातली आहे. आता आभिनेत्री 2023 मध्येही तिच्या जबरदस्त लाइनअपसह चाहत्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळणार आहे. 

बॉलिवडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिने नुकतंच रोहित शेट्टी (Rohit Shetty) प्रदर्शित सर्कस (Cirkus) चित्रपटामध्ये काम केले आहे. अशातच, अभिनेत्री लवकरच सोनू सूद (Sonu Sood) याच्यासोबत त्यांचा आगामी चित्रपट ‘फतेह’साठी हातमिळवणी करणार असून दोन्ही कलाकार पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘विक्रांत रोना’ चित्रपटातील ‘रा रा रक्कम्मा‘या गाण्याने जॅकलिन फर्नांडिसला ब्लॉकबस्टर यश मिळाले. तसेच, प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनी अभिनेत्रीच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुकदेखील केले. याशिवाय ‘सर्कस’ चित्रपटातील तिचा कधीही न पाहिलेला विंटेज लूकही सर्वांना आवडला आहे.

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबदद्ल सांगायचे झाले तर, ती तिच्या आगामी येणाऱ्या ‘क्रॅक’ चित्रपटाचीही नुकतीच घोषणा करण्यात आली असून अभिनेत्री हॉलिवूड प्रोजेक्ट ‘टेल इट लाइक अ वुमन’मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांचा कहर! चक्क ‘बेशरम रंग’ गाण्याचं गझल व्हर्जन, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
स्टेजवर परफॉर्म करत असताना अचानक सपनाने फ्लॉन्ट केला तिचा नवीन टॅटू, व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा