बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनन यांचा ‘भेडिया‘ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तरीदेखील वरुण आणि क्रिती ‘भेडिया’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट हाेण्यासाठी सर्वत्र चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. दरम्यान, वरुणने त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील एक घटना उघड केली आहे जी त्याच्या पहिल्या पगाराशी आणि सानिया मिर्झा हिच्याशी संबंधित आहे. काय आहे किस्सा? चला जाणून घेऊया…
अभिनेता वरुण धवन (varun dhawan) नुकताच ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यूएईला गेला होता. या प्रमाेशनदरम्यान अभिनेत्यानं मुलाखतीत त्याच्या पहिल्या पगाराबद्दल आणि क्रशबद्दल खुलासा केला. अभिनेत्याने सांगितले की, “त्याला सानिया मिर्झा खूप आवडायची. मात्र, सानियासोबतची त्याची पहिली भेट फारशी विशेष नव्हती.” वरुण सांगतो की, “एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान तो सानियाला पहिल्यांदा भेटला होता आणि त्यादरम्यान तो खूप घाबरला होता.”
वरुणने सांगितले की, “सानियाने मला सफरचंद आणण्यास सांगितले होते. मला सफरचंद मिळाले पण ते सफरचंद देताना माझे हात थरथरू लागले. थरथरत्या हातांनी मी कसेतरी ते सफरचंद सानियाच्या आईला देण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने मला खडसावले आणि म्हणाल्या, ‘हे सफरचंद कोणी आणायला सांगितले, सानिया सफरचंद खात नाही.’ पण परिस्थिती आणखी बिघडण्याआधीच सुदैवाने सानिया तिथे पोहोचली. सर्व जबाबदारी स्वत:वर घेत तिने प्रकरण शांत केले. आणि मुलाखतीदरम्यान जेव्हा वरुणला त्याच्या पहिल्या पगाराबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याला एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी पाच हजार रुपये मिळत असल्याचे त्याने सांगितले.
वरुण धवन याच्या काराकीर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘स्टुंडट ऑफ द इयर’, ‘बवाल’, ‘भेडीया’, ‘मैं तेरा हिराे’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. (bollywood actor varun dhawan tells that his crush sania mirza mother scold him for apple actor revealed about his first salary)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मराठमोळ्या अभिनेत्याचे बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण, विकी कौशलसोबत साकारतोय ‘ही’ भूमिका
फटाके वाजवा रे! रश्मिका मंदान्ना अन् विजय देवरकोंडा अडकले विवाह बंधनात?