कलाकार कोणताही असो, तो त्याच्या कलाकृतीसाठी खूप मेहनत घेत असतो. मग ते सिनेमा बनवणे असो किंवा कोणताही स्टंट करणे असो, कलाकार त्यात आपला जीव ओतून ते सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा त्यांचा सिनेमा एकदा बनून तयार होतो, तेव्हा त्या सिनेमाशी त्यांचे घट्ट नाते तयार होते. मात्र, बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांना त्यांचेच सिनेमे पाहायला आवडत नाहीत. हो, हे खरंय. असे काही कलाकार आहेत, जे प्रदर्शनानंतर आपलाच सिनेमा पाहत नाहीत. कोण आहेत ते कलाकार, चला जाणू घेऊया.
करीना कपूर खान
बॉलिवूडमध्ये ‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिचाही या यादीत समावेश होतो. करीना तिच्या सिनेमातील भूमिका चांगल्याप्रकारे वठवते. मात्र, आश्चर्याची बाब अशी की, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिला स्वत:चा सिनेमा पाहायला आवडत नाही. याचा खुलासा तिने नुकताच करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये केला होता. जेव्हा त्याने तिला विचारले की, ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमा पाहणार का? यावर करणने आमिरलाही म्हटले की, “करीना तुझे सिनेमे पाहत नाही. तिला काही फरक पडत नाही की, सिनेमा चालतोय की नाही. किंवा हिट झाला की फ्लॉप झाला. चालला तर चालला, नाही तर नाही.” करीनाही करणच्या या वक्तव्यावर सहमत असल्याचे दिसली. यावर आमिरने हैराण होत विचारले की, “तू तुझे काम पाहत नाही, आणि अभिमानाने सांगतेय?” यावर करीना म्हणाली की, “प्रदर्शित झाल्यानंतर लगेच पाहत नाही, यामुळे चिंता सतावते. नंतर कधीतरी पाहते.”
शाहरुख खान
अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या प्रत्येक सिनेमासाठी चाहते उत्सुक असतात. मात्र, स्वत: शाहरुखच त्याचे सिनेमे पाहत नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, शाहरुखचा असा विश्वास आहे की, “माझ्यासाठी माझे सिनेमे मुलांसारखे आहेत. मी सिनेमांवर मुलांसारखेच प्रेम करतो. त्यामुळे मी माझे सिनेमे पाहत नाही.” शाहरुखचा असाही विश्वास आहे की, “मी माझे सिनेमे कधीच एका दमात पाहत नाही. मी तो सिनेमे छोट्या-छोट्या भागात पाहतो.”
बोमन इराणी
अभिनेते बोमन इराणी (Boman Irani) यांना त्यांच्या पात्रांसाठी ओळखले जाते. ते त्यांच्या प्रत्येक पात्रात जिवंतपणा आणत असतात. ते जरी सहाय्यक भूमिकेत दिसत असले, तरीही त्यांच्या पात्रांमध्ये वजन असते. चाहत्यांनाही त्यांचे सिनेमे खूप आवडतात. मात्र, बोमन इराणी यांना त्यांचेच सिनेमे पाहायला आवडत नाहीत. एका चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले होते की, “मी स्वत:बाबत खूप क्रिटिकल आहे. मी स्वत:ला पडद्यावर पाहू शकत नाही. मी असे केले, तर मी स्वत:मधील अनेक उणीवा काढू शकतो.”
इमरान खान
यादीतील चौथा अभिनेता आहे इमरान खान (Imran Khan). इमरान हा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणजेच आमिर खान याचा पुतण्या आहे. इमरान मागील काही काळापासून सिनेमात दिसत नाहीये. मात्र, त्याच्याबद्दल रंजक बाब अशी की, त्यालाही त्याचे सिनेमे पाहायला आवडत नाहीत. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याने ‘जाने तू या जाने ना’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल एका वर्षांनंतर पाहिला होता. तो म्हणाला होता की, “जेव्हा मी माझे सिनेमे पाहतो, तेव्हा विचार करतो की, हा सीन आणखी चांगला होऊ शकला असता, त्यामुळे मी सिनेमे पाहण्याचे टाळतो.”
तर हे आहेत बॉलिवूड कलाकार, ज्यांना स्वत:चेच सिनेमे पाहायला आवडत नाहीत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, रक्ताच्या थारोळ्यात दवाखान्यात केले दाखल
मौनीने पतीचा वाढदिवस बनवला यादगार, अभिनेत्री बोटीतच झाली रोमँटिक; फोटो व्हायरल
सोनमने घालवली कपूर खानदानाची इज्जत! म्हणाली, ‘माझ्या मैत्रिणींसोबत झोपलेत माझे सर्व भाऊ’