कोणी भीक मागितली, तर कुणी मनात कुढत राहिलं; म्हातारपणी ‘या’ कलाकारांचे आयुष्य गेले अत्यंत वाईट अवस्थेत

काहीदिवसांपूर्वी दिवंगत अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांची बहीण कनीज बलसारा हिला तिची सून समीनाने घरातून हाकलून दिले. एवढेच नाही, तर ९६ वर्षीय कनीजला तिच्या सुनेने एकही पैसे न देता ऑकलंडहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसवले. ही माहिती कनीजची मुलगी परवीजलाही देण्यात आली नव्हती.

कनीजच्या आधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी वृद्धापकाळात किंवा अडचणीच्या वेळी कुटुंबाला एकटे सोडल्याच्या बातम्या आल्या आहेत. चला तर मग अशाच काही सेलिब्रिटींवर एक नजर टाकूया.

गीता कपूर
‘पाकीजा’ (१९७२) सारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री गीता कपूर यांचे २६ मे २०१८ रोजी निधन झाले. गीता यांचे शेवटचे दिवस अत्यंत दुःखात गेले आणि त्यांच्या मुलांनी त्यांची काळजी घेतली नाही. गीताचा कोरिओग्राफर मुलगा त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडून पळून गेला होता. अशोक पंडित आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटी गीता यांच्या उपचाराचा खर्च करत होते.

विमी
सुनील दत्त अभिनित ‘हमराज’ हा सिनेमा १९६७ मध्ये प्रदर्शित झाला. बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणाऱ्या विमी यांना या चित्रपटाने स्टार बनवले. ‘हमराज’ची गाणी प्रचंड गाजली. या चित्रपटाच्या यशाने विमी यांना जवळपास १० चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. दारूचे व्यसन, वाढते कर्ज आणि वाईट कौटुंबिक जीवन यामुळे विमीचे करिअर खराब झाले. स्टार बनल्यानंतर १० वर्षांनीच त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह चहाच्या टपरीवर ठेवून स्मशानभूमीत नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विमी यांचे कुटुंबीय त्यांच्या चित्रपटांमध्ये करिअर करण्याच्या विरोधात होते, त्यामुळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कोणीही पोहोचले नाही.

अचला सचदेव
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (१९९५) चित्रपटात सिमरन म्हणजेच काजोलच्या आजीच्या भूमिकेत दिसलेल्या अचला सचदेवचा जन्म ३ मे १९२० रोजी पेशावर, पाकिस्तानमध्ये झाला. ३० एप्रिल २०१२ रोजी पुण्यातील रुग्णालयात एकाकीपणाशी झुंज देत त्यांचे निधन झाले. यादरम्यान अमेरिकेत राहणारा त्यांचा मुलगा ज्योतिन यानेही त्यांची काळजी घेतली नाही.

अचला यांचे पती क्लिफर्ड डग्लस पीटर्स यांचे २००२मध्ये निधन झाले. यानंतर ती पुण्यातील पूना क्लबजवळील कोणार्क इस्टेट अपार्टमेंटमधील दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये १२वर्षे एकट्याच राहिल्या. या दरम्यान रात्री फक्त एक परिचर तिथे राहून त्यांची काळजी घेत असे. माध्यमांतील वृत्तानुसार, अचला यांनीही आपल्या आयुष्याचा शेवटचा टप्पा अत्यंत गरिबीत घालवला होता.

जगदीश माळी
अंतरा माळीचे वडील आणि प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना दिसले. जगदीश यांना मिंक ब्रार नावाच्या मॉडेलने ओळखले. त्यांना जेवण दिले आणि नंतर सलमान खानच्या कारने घरी नेले. जगदीश हे मानसिकदृष्ट्या स्वस्थ दिसत नव्हते आणि त्यांनी फाटके कपडे घातले होते. यावरून ते किती वाईट आयुष्य जगत होते, याचा अंदाज येतो. १३ मे २०१३ रोजी त्यांचे निधन झाले.

भारत भूषण
लोकप्रिय अभिनेते भारत भूषण यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांची प्रकृती खूपच वाईट झाली होती. ३७ जानेवारी १९९२ रोजीही अत्यंत गरिबीत त्यांचा मृत्यू झाला. मोठा भाऊ म्हणत भारतने अनेक चित्रपटांची निर्मिती केली. यातील ‘बसंत बहार’ आणि ‘बरसात की रात’ हे दोन चित्रपट सुपरहिट झाले आणि भारत भूषण श्रीमंत झाले. त्याला भरपूर पैसे मिळाले. यानंतर भारत भूषण यांचे भाऊ रमेश यांनी त्यांना आणखी चित्रपट करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

 

भारत भूषणने आपल्या भावाची आज्ञा पाळली आणि तेच केले. पण, नंतर त्यांनी केलेले सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. अशा स्थितीत भारत भूषण कर्जात बुडाले. भारत भूषण यांनी जे काही कमावले होते ते गमावले. त्यांचे बंगले विकले गेले, गाड्या विकल्या गेल्या. भारत भूषण गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होते. पण, उपचारासाठी कोणी नव्हते आणि त्यांची काळजी घेणारेही कोणी नव्हते.

सतीश कौल
सतीश कौल हे हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये प्रसिद्ध नाव असायचे. १९७४ ते १९९८ पर्यंत सतीश कौल यांनी ३००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. परंतु त्यांची आर्थिक स्थितीही बिकट होती. त्याच्याकडे उपचारासाठीही पैसे नव्हते. पडल्यामुळे सतीश कौल यांचे हाड फ्रॅक्चर झाले होते. या दुखापतीतून ते सावरू शकले नाहीत. सतीश कौल हे बरेच दिवस लुधियानामध्ये राहत होते. २०११ मध्ये ते मुंबई सोडून पंजाबला गेले आणि तिथे त्यांनी अभिनयाची शाळा उघडली. सतीश कौल यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘प्यार तो होना ही था’, ‘आंटी नं १’ सारख्या चित्रपटात काम केले. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते एकटेच राहत होते. अनेक वर्षांपूर्वी घटस्फोट घेऊन पत्नी अमेरिकेत शिफ्ट झाली.

हेही वाचा :

Latest Post