Tuesday, October 15, 2024
Home बॉलीवूड बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत सर्वात महागड्या घरांच्या मालकीण, किंमत ऐकून तुम्ही व्हाल अवाक्

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत सर्वात महागड्या घरांच्या मालकीण, किंमत ऐकून तुम्ही व्हाल अवाक्

बॉलीवूडमधील स्त्री-पुरुषांमधील पगारबाबत नक्कीच सुधारणा झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनशैलीवरही दिसून येत आहे. बॉलीवूड अभिनेत्री मोठमोठी रक्कम घेतात आणि ती त्यांच्या आलिशाने जीवनशैली व्यतिरिक्त सेविंग्सवर खर्च करतात. याशिवाय अभिनेत्री प्रॉपर्टी खरेदी करण्यातही रस दाखवतात. इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे महागडे घर आहे. चला, तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

आजकाल गँगस्टर सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री जॅकलीन (jacqueline fernandez) हिने नुकतेच मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे एक नवीन आलिशान घर घेतले आहे. हे घर पाली हिलच्या एका पॉश परिसरात आहे, जिथे अनेक बॉलिवूड स्टार राहतात. माध्यमातील वृत्तांनुसार, जॅकलिनच्या नवीन घराच्या इमारतीमध्ये पूल, जिम आणि सुंदर लाउंज आहे आणि त्याची किंमत जवळपास 12 कोटी रुपये आहे. मात्र, किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आलिया भट्ट ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती चित्रपटांसाठी भरमसाठ फी घेते. आलिशान जीवन जगणारी आलिया बचतीकडेही खूप लक्ष देते. माध्यमातील वृत्तांनुसार, एप्रिलमध्ये आलिया भट्टने मुंबईतील वांद्रे वेस्टमध्ये 37 कोटी रुपये किंमतीचे नवीन घर खरेदी केले आहे. या व्यतिरिक्त आलियाने तिची बहीण शाहीन हिला 7.68 कोटींचे दोन फ्लॅट गिफ्ट केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 13’ मधून लोकप्रियता मिळवणारी आणि पंजाबची कॅटरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिलने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पहिल्याच चित्रपटानंतर शहनाजने मोठे यश मिळवले आणि स्वतःचे घर घेतले. सोशल मीडिया पोस्टद्वारे तिने चाहत्यांना याची माहिती दिली होती. मात्र, अभिनेत्रीच्या घराच्या किंमतीबाबत काेणतीही अधिकृत माहित समाेर आली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घराची गणना बी-टाऊनमधील सर्वात आलिशान आणि महागड्या घरांमध्ये केली जाते. शिल्पाच्या घराची किंमत जवळपास 100 कोटी आहे, जिथे सर्व सुविधा आहेत. शिल्पाच्या या सुंदर घराचे नाव ‘किनारा’ आहे. शिल्पा ज्या भागात राहते तो भाग मुंबईचा सर्वात महागडा भाग मानला जातो. घरातील खोल्यांपासून ते स्वयंपाकघरापर्यंत अगदी लक्झरी वस्तूंनी तयार करण्यात आलेले हे घर आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत नाव कमावत आहे. प्रियांकाला देखील संपत्तीची कमतरता नाही. प्रियांका पती निकसोबत लॉस एंजेलिसमध्ये करोडोंच्या घरात राहते. प्रियांकाच्या घरात सात बेडरूम, 11 बाथरूम, थिएटर, गेम रूम, बास्केटबॉल कोर्ट आणि स्विमिंग पूल आहे. लॉस एंजेलिसशिवाय प्रियांकाची भारतातही अनेक सुंदर घरे आहेत.( bollywood actress are owner of expensive house jacqueline fernandez shilpa shetty shehnaaz gill priyanka chopra)

अधिक वाचा-
कपूर खानदानाचा ‘तो’ नियम मोडण्यासाठी नीतू यांना लागली होती 26 वर्षे, 21व्या वयात थाटलेला संसार

अमिताभ बच्चन यांनी ट्राेलर्सबाबत व्यक्त केलं मत; म्हणाले, ‘आता लोक मला गरीब अन् निर्बुद्ध…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा