Thursday, April 18, 2024

बिपाशा बासूने लेक देवीसोबतचा शेअर केला डान्स रील, चाहत्यांनी अशाप्रकारे केला प्रेमाचा वर्षाव

बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू अन् तिचा पती करण सिंग ग्रोव्हर पाच महिन्यांपूर्वी एका सुंदर मुलीचे पालक झाले आहेत. बिपाशाला ज्या दिवसापासून आई बनण्याचा आनंद मिळाला त्या दिवसापासून बिपाशा बसू तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुलीसोबतच्या पोस्ट शेअर करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने नुकताच पुन्हा एकदा तिच्या मुलीचा तिच्यासोबतचा व्हिडिओ रील शेअर केला आहे.

बिपाशा बासू (bipasha basu) हिने नुकताच तिच्या मुलीसोबतचा एक डान्स व्हिडिओ रील शेअर केला आहे. अभिनेत्रीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘देवीसोबत डान्स करणे, हे आता माझे आवडते काम आहे.’ यासोबतच बिपाशा बसूने तिच्या कॅप्शनमध्ये मुलीसोबत रेड हार्ट इमोजी आणि डान्स इमोजीही शेअर केले आहेत.

बिपाशा बासूने शेअर केलेल्या डान्स व्हिडीओ रीलमध्ये तिने तिची मुलगी देवी हिला बेबी कॅरियरमध्ये घेतल्याचे दिसून येते. अभिनेत्री तिच्या आलिशान घराच्या बाल्कनीत आकाशाखाली तिच्या मुलीसोबत अतिशय स्टायलिश डान्स करताना दिसत आहे. बिपाशा तिच्या मुलीला तिच्याच स्टाईलमध्ये डान्स करायला लावतेय आणि तिची बोटं अप्रतिमपणे डान्स करत आहे. व्हिडिओ रीलमध्ये बिपाशा बसूने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यासोबत तिची मुलगी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशा बासूच्या व्हिडीओ रीलवर एका चाहत्याने कमेंट केली की, ‘मी नेहमी लोकांकडून ऐकले आहे की, तुम्ही ज्यांना भेटलात त्यांच्याशी तुम्ही खूप छान वागले आहात. देव तुमचे भले करो.’ यासोबत आणखी एका चाहत्याने कमेंट केली की, ‘तुझी सर्वोत्तम भूमिका आई आहे.’ याशिवाय अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेक चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.( bollywood actress bipasha basu share a video reel on instagram with dance her daughter watch full details)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY | खराब कॉमिक टायमिंगसाठी ऐकावे लागले टोमणे, 40 ऑडिशननंतर शरमन जोशीला मिळाली ‘या’ चित्रपटात भूमिका

‘3 इडियट्स’सारख्या चित्रपटात काम करूनही अभिनेत्याला ‘या’ चित्रपटासाठी द्यावे लागले होते तब्बल 40 वेळा ऑडिशन; वाचा संघर्षमय प्रवास

हे देखील वाचा