Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

दीपिका कॅटरिना एकत्र येऊन करणार हेरगिरी! नव्या सिनेमाची जोरदार तयारी

दीपिका पदुकोण आणि कॅटरिना कैफ यांना पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. माध्यमातील वृत्तांनुसार, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपटात दीपिका आणि कॅट एकत्र दिसण्याची शक्यता आहे. ‘पठाण‘ चित्रपटात शाहरुख खान आणि सलमान खानला एकत्र पाहून प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. अशाच आता निर्माते दोन्ही अभिनेत्रींच्या बाबतीतही हा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत.

25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. शाहरुख खानने या चित्रपटाद्वारे जोरदार पुनरागमन केले. अशात आता सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाची क्रेझही प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढली आहे. याशिवाय ‘पठाण’च्या दुसऱ्या भागाबाबतही जाेरदार चर्चा सुरु आहे. यासोबतच स्पाय युनिव्हर्सच्या कोणत्याही चित्रपटात दीपिका आणि कॅटरिना एकत्र दिसणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

स्पाय युनिव्हर्समध्ये स्त्री-आधारित चित्रपटांची कमतरता आहे. मात्र, यशराज फिल्म्स ही उणीव बर्‍याच प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. दीपिकाने ‘पठाण’ चित्रपटात रुबिना मोहसीनच्या भूमिकेत एजंटची भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे, टायगर चित्रपटात कॅटरिना कैफने झोया एजंटच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकलीत. या दोन्ही अभिनेत्रींचा ढासू अॅक्शन अवतार या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला. अशात आता दोन्ही अभिनेत्री एकत्र पडद्यावर स्पाय चित्रपट करताना दिसणार आहेत.

अलीकडेच, ‘पठाण’ चित्रपटाचे पटकथा लेखक श्रीधर राघवन यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूचित केले आहे की, आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटात दीपिका आणि कॅटरिना एकत्र दाखवले जाऊ शकतात. तर झाले असे की , लेखकाला, बॉलीवूडमध्ये महिलांवर आधारित स्पाय चित्रपटांच्या कमतरतेबद्दल विचारण्यात आले, यावर ते म्हणाले, “होय, कमतरता आहे. पण, ही पोकळी आम्ही भरून काढत आहोत. महिलांवर आधारित स्पाय चित्रपट बनवण्याची आमची योजना आहे.” असे श्रीधर राघवन म्हणाले.(bollywood actress deepika padukone and tiger 3 katrina kaif to headline yrf spy universe after salman khan srk)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अखेर हनी सिंगने बादशाहसाेबतच्या वादावर साेडले माैन; म्हणाला,”आम्ही कधीच मित्र…”

चिंताजनक! देबिना बॅनर्जीची प्रकृती खालावली, अभिनेत्रीला झाली ‘या’ विषाणूची लागण

हे देखील वाचा