Sunday, June 23, 2024

दीपिका पदुकोणपासून ते तापसी पन्नूपर्यंत ‘या’ अभिनेत्री दिसणार पोलिसांच्या भूमिकेत

कॉप ड्रामा प्रेक्षकांना खूप आवडतो. त्यामुळेच ‘चुलबुल पांडे‘पासून ‘बाजीराव सिंघम‘पर्यंत प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडण्यात यश आले आहे. आता सिनेसृष्टीतील अभिनेत्रीही पोलिसाची भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडील आगामी सीरिज आणि चित्रपटांमध्ये, बॉलीवूडच्या टाॅप अभिनेत्री दीपिका पदुकोण, तापसी पन्नू, तब्बू, मृणाल ठाकूर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या अभिनेत्रीविषयी आणि त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी…

तापसी पन्नू
वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात तापसीने एक अनाेखे स्थान निर्माण केले आहे. अशात तापसी पन्नू (taapsee pannu) प्रतीक गांधीसोबत ‘वो लड़की है कहां?’मध्ये एका पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘वो लड़की है कहां?’ हा एक कॉमेडी ड्रामा असून तापसीचीही पहिलीच आउट-एंड-कॉमेडी भूमिका असेल.

तब्बू
बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू (Tabu) ‘भोला’मध्ये पाेलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, तब्बू यापूर्वीही पोलिसाच्या भूमिकेत दिसली आहे, ज्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. हातात बंदूक आणि डाेळ्यावर गॉगल घातलेला तिचा बॉस-लेडी लूक पाहून, तिचे चाहते ‘भोल या चित्रपटामध्ये तिचा पोलीस लूक पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दीपिका पदुकोण
रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये लेडी सिंघम म्हणून दीपिका पदुकोण (deepika padukone) हिच्या नावाच्या अनाउंसमेंटने सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या चित्रपटात दीपिका पहिल्यांदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मृणाल ठाकूर
आदित्य रॉय कपूरसोबत मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) टी-सीरीज आणि सिने1 स्टुडिओच्या ‘गुमराह’मध्ये पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘सीता रमन’ या चित्रपटात आपला उत्कृष्ट अभिनय सादर करणाऱ्या मृणाल ठाकूरला पोलीस कर्मचाऱ्याच्या भूमिकेत पाहणे खूप मनोरंजक असेल.(bollywood actresses in cop role from deepika padukone to actress taapsee pannu these actresses will play police role `see here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रीदेवी नव्हती देत बोनी कपूर यांना भाव, मग अशी लढवली शक्कल; आपल्यापेक्षा 8 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत थाटला संसार

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांवर कडाडली कंगना; सोशल मिडियावर स्वत:चीच यादी केली शेअर

हे देखील वाचा