‘मस्तानी’ दीपिकाला युजरकडून शिवीगाळ, अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा

Bollywood Actress Deepika Padukone Gives Solid Reply To Troller With Share Screenshot Who Abused Actress On Instagram Post Viral


बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण चित्रपट सृष्टीत नावजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या स्टाईलमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. दीपिका सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. ती फक्त तिचे फोटो आणि व्हिडिओज शेअर करत नाही, तर तिच्या वैयक्तिक जीवनातील अनेक अनुभव देखील ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसेच दीपिका अनेक वेळा सोशल मीडियावरील अनेक युजर्सला धडा शिकवताना दिसत असते. असाच काहीसे घडले आहे. दीपिकाने नुकतेच एका युजरला ट्रोल केल्याबद्दल चांगलाच धडा शिकवला आहे.

दीपिका पदुकोणला एका युजरने वैयक्तिक इनबॉक्समध्ये मेसेज करून शिवीगाळ केली. युजर्सच्या या वागणुकीला दीपिकाने अजिबात दुर्लक्षित नाही केले. तिने या युजरला साध्या पद्धतीने उत्तर देणे ठरवलं. दीपिकाने त्या युजरच्या मेसेजचा स्क्रीनशॉर्ट आपल्या स्टोरीला पोस्ट करून असे लिहले आहे की, “तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि तुमच्या मित्रमंडळींना तुमच्यावर खूप गर्व होत असेल.”

दीपिका पदुकोणकडून हे सडेतोड प्रत्युत्तराचा स्क्रीनशॉर्ट स्टोरीला पोस्ट झाल्यावर, हा स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल झाला. तसेच अनेक प्रेक्षकांना दीपिकाचा हा कमी शब्दात रिप्लाय देण्याचा अंदाज देखील खूप आवडला आहे.

दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिचा पती ‘रणवीर सिंग’ याच्यासोबत ’83’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘कबीर खान’ दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका ही कपिल देवची पत्नी रोमी देवी हिचे पात्र निभावणार आहे. सोबतच रणवीर सिंग कपिल देवचे मुख्य पात्र निभावणार आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, जो विश्वचषक विजेता माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या व्यतिरिक्त दीपिका सध्या शकुन बत्रा यांच्या ‘अनटायटल्ड’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी हेही दिसतील.

या दोन चित्रपटांव्यतिरिक्त दीपिका पदुकोण ही शाहरूख खान सोबत ‘पठाण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या निदर्शनास येणार आहे. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त ‘जॉन अब्राहम’ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच ती ऋतिक रोशन सोबत ‘फायटर’ या चित्रपटात देखील काम करणार आहे. सिध्दार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.