Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड घटस्फाेटाच्या चर्चेदरम्यान दीपिका अन् रणवीरचा नवीन व्हिडिओ व्हायरल; अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून…’

घटस्फाेटाच्या चर्चेदरम्यान दीपिका अन् रणवीरचा नवीन व्हिडिओ व्हायरल; अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून…’

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. याआधी या कपलने जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केले होते. अशात अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान दीपिकाने रणवीरकडे दुर्लक्ष केल्याची बातमी चर्चेत होती. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाल्याचे देखील बोलले जात होते. मात्र, भांडणाच्या बातम्यांदरम्यान दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा एक नवीन रोमँटिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीपिका (deepika padukone) तिच्या डेब्यू फिल्म ‘ओम शांती ओम’ मधील डायलॉग म्हणताना ऐकू येत आहे. दीपिका म्हणते, “कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.” या डायलाॅगच्या उत्तरात रणवीर म्हणताे की, “मला विचारा… मी याची हमी देऊ शकतो.”

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील ‘दीपवीर’च्या केमिस्ट्रीमुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरं तर, याच कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवरून आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो पाहून या जोडप्याचे चाहते चिंतेत पडले होते. त्या व्हिडिओमध्ये दीपिका रणवीरचा हात धरण्याचे टाळताना दिसत होती. त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे  देखील बोलले जात होते.

अशात दीपिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्री मेगा ब्लॉक बस्टर ‘पठाण’च्या यशाचा आनंद लुटत आहे, तर रणवीर सिंग लवकरच करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याव्यतिरिक्त आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. (bollywood actress deepika padukone ranveer singh new video viral amid reports of their fight )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंधराच दिवसात आईवडील गमवणाऱ्या लेखिकेबद्दल आणि सेटवर काम करणाऱ्यांबद्दल मिलिंद गवळी यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल

‘जैतर’ मधून समोर येणार सत्यघटनेवर आधारित रोमांचक प्रेमकहाणी, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा