आनंदाची बातमी! दिया मिर्झा दुसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत, ‘या’ दिवशी घेणार ‘सात फेरे’

Bollywood Actress Dia Mirza Is Getting Married With Businessman Vaibhav Rekhi On February 15 As Per The Reports


सध्या बॉलिवूडमधून एकापाठोपाठ एक आनंदाची बातमी येत आहे. काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत, तर कोणाच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होत आहे. अशामध्ये आता आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात घर करणारी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, दिया मिर्झा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ही बातमी ऐकून तिचे चाहते खूपच खुश झाले आहे.

दिया एका दिवसानंतर म्हणजेचं 15 फेब्रुवारीला लग्नाचं बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिया ही दुसऱ्या तिसऱ्या कोणाशी नाही, तर उद्योजक ‘वैभव रेखी’सोबत लग्न करणार आहे. दियाच्या लग्नाला अगदी तिचे काही जवळचे नातेवाईक आणि काही मित्रमंडळी असणार आहेत. केवळ एवढ्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत दिया तिचा लग्न सोहळा संपन्न करणार आहे. तिच्या या लग्नाला खूपच खासगी ठेवलं जाणार आहे. तिच्या आणि वैभवच्या लग्नाने त्यांच्या दोघांच्याही घरचे खूपच खुश आहेत. लग्नाची जोरदार तयारी देखील चालू आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, दिया आणि वैभव हे दोघेही लॉकडाऊन दरम्यान एकमेकांच्या जवळ आले. लॉकडाऊनमधे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला. एकमेकांना समजून घेतीले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याला ऑफिशिअल नाव देण्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वैभवबद्दल सांगायचे झाल्यास, तो मुंबईचा उद्योजक आणि गुंतवणुकदार आहे. तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसोबत त्याचे खूप चांगले संबंध आहे.

दिया मिर्झा हिने वैभवच्या आधी ‘साहिल संघा’ याच्यासोबत लग्न केले होते. परंतु लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांनी एकमेकापासून लांब होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या दोघांनीही 2019 मध्ये सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची बातमी सगळ्या प्रेक्षकांना सांगितली. साहिल आणि दियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करून एकमेकांनाबद्दलच्या भावना शेअर केल्या होत्या. त्यांनी असे लिहले होते की, ‘जरीही आम्ही वेगळे होत असलो, तरी आमच्या मधील मैत्री तशीच राहील. आम्ही नेहमीच एकमेकांचा आदर करतो.’

सन 2019 नंतर आता दियाने वैभवसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिया मिर्झा तिच्या ‘रेहना है तेरे दिल मैं’, ‘तेहझीब’, ‘कोई मेरे दिल में हैं’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘संजू’ या चित्रपटांसाठी ओळखली जाते. ती मागील वर्षी तापसी पन्नू अभिनित ‘थप्पड’ चित्रपटात शेवटची दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.