कंगना रणाैतने चित्रपटसृष्टीत मित्रांपेक्षा जास्त शत्रूच कमावले आहेत. सोशल मीडिया असो किंवा मुलाखत, ती आपल्या बेधडक शब्दांनी लोकांना टोचणे थांबवत नाही. यामुळेच लोक तिला टार्गेट करण्यापासून स्वत:ला राेखू शकत नाही. अशातच प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री यांनी कंगनाबाबत एक माेठे विधान केले आहे. त्यांनी अभिनेत्रीच्या पद्मश्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सरकारवर साउथ सिनेमाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला आहे.
तेलगू सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण या ‘अनस्टॉपेबल विथ एनबीके’ नावाचा टॉक शो होस्ट करतात. पहिल्या सीझनमध्ये दहा भागांच्या यशस्वी रननंतर, शो लवकरच या वर्षी ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या सीझनसह बंद हाेणार आहे. शोमध्ये अलीकडेच अभिनेत्री जयसुधा, जया प्रदा आणि राशी खन्ना या पाहुण्या म्हणून कार्यक्रमात उपस्थित होत्या आणि त्यांनी शोच्या होस्टशी संवाद साधला. या शाेदरम्यान जयसुधा यांनी भारत सरकार दक्षिण भारतीय चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका केली.
जयसुधा म्हणाल्या, “कंगना रणाैतला पद्मश्री मिळाल्याने मला कोणतीही अडचण नाही. ती एक चांगली अभिनेत्री आहे. मात्र, त्यांनी अवघ्याा 10 चित्रपटांमध्येच काम केले आणि त्यांना हा पुरस्कार मिळाला. इकडे आम्ही अनेक चित्रपटात काम केले, पण सरकारने लक्षही दिले नाही. जयसुधा आपला मुद्दा पुढे करत म्हणाल्या, “गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या महिला दिग्दर्शिका विजया निर्मला यांचेही इतके कौतुक झाले नाही. सरकार दक्षिणेला दाद देत नाही याचे कधी कधी वाईट वाटते.” विजया यांनी 2002 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक महिला दिग्दर्शक म्हणून नाव नोंदवले होते, ज्यांनी जगातील सर्वाधिक 44 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
जयसुधा या दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक भाषांमध्ये काम केले आहे. त्यांनी 1972 साली ‘पंदन्ति कापूरम’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. हिंदी सिनेसृष्टीत त्या अमिताभ बच्चन यांच्या ‘सूर्यवंशम’ या चित्रपटासाठी ओळखली जातात.(bollywood actress kangana ranaut got padma shri within ten films south actress jayasudha says south actors are not recognised by government)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तुनिषाच्या टॅटूची साेशल मीडियावर चर्चा; हातावर लिहिला हाेता ‘हा’ खास संदेश
फटाके वाजवा रे! एजाज खान अन् पवित्रा पुनिया अडकणार लग्न बंधनात; अशी आहे लव्हस्टाेरी