‘या’ चित्रपटाने बदलले कंगनाचे नशीब, १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीसोबत केली स्वत:ची तुलना

Bollywood Actress Kangana Ranaut Tweet On Film Tanu Weds Manu Turns 10 Years


बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणून ज्या अभिनेत्रीला ओळखले जाते, ती म्हणजेच ‘कंगना रणौत’. कंगना ही बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री आहे. ती आज आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर आहे. परंतु यापूर्वी तिने खूप मेहनत घेतली होती. आज तिच्या एका सिनेमाने आपली १० वर्षे पूर्ण केली आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर भलताच हिट ठरला होता. त्यामुळे तिचे नशीब बदलले होते. याच सिनेमाबद्दल कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाच्या ‘तनू वेड्स मनू’ या सिनेमाने १० वर्षे पूर्ण केली आहे. हा सिनेमा १० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच २५ फेब्रुवारी, २०११ ला रिलीझ झाला होता. या सिनेमात कंगनासोबत सुपरस्टार आर माधवनही मुख्य भूमिकेत होता. या रोमँटिक सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते, तर याची कहाणी हिमांशू शर्मा यांनी लिहिली होती.

कंगनाने ट्विटरवर लिहिले की, या चित्रपटानेच तिच्या कारकीर्दीची दिशा बदलली.

खरं तर झाले असे की, कंगनाच्या एका चाहत्याने तिला टॅग करत लिहिले की, “मला कंगनाचा हा लूक खूप आवडतो.”

या ट्वीटवर प्रतिक्रिया देत कंगनाने प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीसोबत तुलना करताना म्हटले की, “मी वेडे करून टाकणाऱ्या भूमिकेत अडकले होते. या चित्रपटाने माझ्या कारकीर्दीची दिशाच बदलली. माझी कॉमेडी अंदाजात एंट्री होती. क्वीन आणि दत्तोसोबत मी आपल्या कॉमिक टायमिंगला मजबूत केले, आणि कॉमेडीसाठी श्रीदेवी यांच्यानंतर मी एकमात्र अभिनेत्री बनले.”

या चित्रपटाचा सिक्वल ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ सन २०१५ मध्ये आला होता. यामध्ये कंगना डबल रोलमध्ये दिसली होती.

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये कंगनाने म्हटले की, “आनंद एल राय आणि आमचे लेखक हिमांशू शर्मा यांना या फ्रँचायझीसाठी धन्यवाद! जेव्हा ते माझ्याकडे संघर्ष करणाऱ्या निर्मात्याप्रमाणे आले, तेव्हा मी विचार केला की, मी त्यांची कारकीर्द घडवू शकते. परंतु याव्यतिरिक्त त्यांनीच माझी कारकीर्द घडवली. कोणीच सांगू शकत नाही की, कोणता चित्रपट केव्हा चालेल आणि कोणता नाही? सर्व नशीब आहे.”

कंगना सध्या आपल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिचा आगामी चित्रपट जयललिता यांच्या बायोपिकवर आधारित आहे. हा चित्रपट २३ एप्रिल, २०२१ मध्ये रिलीझ होईल. याव्यतिरिक्त तिने नुकतेच आपल्या ‘धाकड’ सिनेमाचे शूटिंग संपवले आहे. हा सिनेमा १ ऑक्टोबर, २०२१ रोजी पडद्यावर येईल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भोजपुरी गायक नीलकमल सिंगचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ; इंटरनेटवर करतंय धमाल, पाहा व्हिडिओ

-रेकॉर्ड ब्रेक युट्यूबर अंकित यादवचा नवा विक्रम, ‘त्या’ गाण्याला मिळाल्या तब्बल ६४ कोटी हिट्स

-‘कुंवारी आपने छोड़ा नहीं और श्रीमती किसी ने बनाया नहीं’, म्हणत गंगुबाई काठियावाडीचा पहिला टिझर रिलीझ


Leave A Reply

Your email address will not be published.