दिलं थाम के बैठीये! कॅटरिना कैफच्या पाच बहिणींपैकी इसाबेला लवकरच झळकणार बॉलीवूडच्या ‘या’ सिनेमात


आपल्या सौंदर्याने आणि बोल्डनेसने सगळ्यांना घायळ करणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. तिने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होते आणि पुढे इंडस्ट्रीमध्ये नावं कमावलं. कतरिना तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे देखील बऱ्याच वेळा चर्चेचा विषय बनली आहे. कतरिना कैफ हिला 5 बहिणी आहेत आणि या सगळ्याच खूप सुंदर आणि बोल्ड आहेत. सगळ्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे की, कतरिनाची बहिण ‘इसाबेल कैफ’ ही लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

कतरिनाची बहिण इसाबेल कैफ ही ‘सुस्वागतम खुशामदिद’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ‘पुलकित सम्राट’ हा तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनेक सामाजिक प्रश्नावर आधारित असलेला हा चित्रपट ‘धीरज कुमार’ यांनी दिग्दर्शित केला आहे. इसाबेल कैफ ही आपल्या आगामी चित्रपटात ‘नूर’ ही भूमिका निभावताना दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग नुकतीच पूर्ण झाली आहे आणि चित्रीकरणातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

इसाबेल कैफ ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ आणि आपल्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल देखील अनेक पोस्ट शेअर करत असते. तिच्या या फोटोजला सोशल मीडियावर खूपच पसंती मिळते. इसाबेला ही आपल्या बहिणीप्रमाणेच खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

या चित्रपटात इसाबेलसोबत मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता पुलकित सम्राट तिचे कौतुक करताना लिहतो की,” इसाबेला ही खूपच मेहनती मुलगी आहे आणि तिच्या सोबत काम करताना मला खूपच मज्जा येत आहे.”

सुस्वागतम खुशामदिद हा चित्रपट सामाजिक प्रश्नांना समोर आणून प्रेक्षकांचे मनोरंजन देखील करणार आहे. या चित्रपटात पुलकित दिल्लीच्या ‘अमन: या मुलाची भूमिका निभावताना दिसणार आहे ,तर इसाबेल ही आग्राच्या ‘नूर’ या मुलीची भूमिका निभावताना दिसणार आहे.

इसाबेल ही सुस्वागतम खुशमदीद व्यतिरिक्त ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटात देखील दिसणार येणार आहे. स्टॅनली डीकोस्टा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.