अभिनेत्री करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित या 90च्या दशकातील सुपरहिट हिरोईन आहेत. दोघांनीही त्या काळात अनेक हिट चित्रपट दिले आहेत, जे आजही चाहत्यांना प्रचंड आवडतात. असाच एक चित्रपट होता ‘दिल तो पागल है‘, ज्यामध्ये माधुरी आणि करिश्मा कपूर यांनी एकत्र काम केले होते आणि चाहत्यांना ही जोडी खूप आवडली होती. अशात आता 26 वर्षांनंतर करिश्मा आणि माधुरीने पुन्हा एकदा चाहत्यांना त्यांच्या मैत्रीची झलक दाखवली आहे.
माधुरी दीक्षित (madhuri dixit) आणि करिश्मा कपूर (karisma kapoor) यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही मस्ती करत नाचताना दिसत आहेत. खरेतर सर्वांनाच माहित आहे की, माधुरी आणि करिश्मा दोघीही उत्कृष्ट डान्सर आहेत, अशा परिस्थितीत जेव्हा दोघांनी एकत्र डान्स केला तेव्हा दाेघींचाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे या दोन्ही अभिनेत्री अगदी साध्या लूकमध्ये खूपच मस्त दिसत आहेत.
माधुरीने पिवळ्या आणि जांभळ्या रंगाचा वन-पीस ड्रेस परिधान केला आहे, तर करिश्माने तपकिरी रंगाचा चेकर्ड कुर्ता पायजमा घातला आहे. व्हिडिओशिवाय, दोघांनीही या क्षणाचे त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्यांच्या मैत्रीचे नाते स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांसह प्रसिद्ध स्टार्सनेही कमेंट करत अभिनेत्रींचे काैतुक केले आहे. व्हिडिओ आणि फोटो शेअर करत माधुरीने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘दोस्ती वाला डान्स’.
View this post on Instagram
माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांचा ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खानही मुख्य भूमिकेत होता. चित्रपटातील तिघांमधील स्टाेरी चाहत्यांना प्रचंड आवडली हाेती, ज्याचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते.(bollywood actress madhuri dixit and karisma kapoor dance video viral on social media fans missing shah rukh khan)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे बाप! डिलीव्हरीनंतर अवघ्या 18 दिवसात सुप्रसिद्ध अभिनेत्रीने कमी केलं वजन, पण कसं?
कुस्तीपटूंविरुद्धच्या पोलीस कारवाईवर नकुल मेहताची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला,’लज्जास्पद…’