Friday, March 29, 2024

‘सब गोलमाल है भाई…ये पप्पू कभी पास नही होगा!’, अभिनेत्री पुजा भट्टचा खुलासा

कॉंग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा‘ नुकतच महाराष्ट्रात पर पडली आहे. यात्रेमध्ये अनेक कालाकर आणि राजकारणी देखिल सामील झाले होते. त्यामुळे यात्रेच्या चर्चाना चांगलेच उधान आले असून महाराष्ट्रामध्ये चांगला प्रतिसादही लाभला होता. यामुळे अनेक वादही होताना पाहिले. या यात्रेचा प्रवास सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. 

“भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) हा प्रवास कॉंग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरु करुन दोन महिन्यापेक्षाही अधिक काळ लोटला आहे. ही यात्रा कन्याकुमारी ते केरळ असा 3500 किलो मीडटरची पद यात्रा काढली. त्यानंतर तामिळनाडू, केरळ, कर्नाटका, तेलंगणा या राज्यांचा प्रवास करत गेल्या 7 नोव्हेंबरपासून ही यात्रा सुरु केली होती. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री पुजा भट्ट (Pooja Bhatt), अमोल पालेकर (Amol Palekar), रिया सेन (Ria Sen), रश्मी देसाई (Rashmi Desai) काही कलाकारही सहभागी झाले होते.

मात्र, भाजपचे नेते अमित मालवीय (Amit Malviya)यांनी यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारंना कॉंग्रेस पक्षाने पैसे दिल्याचा आरोप केला आहे. भाजपने आरोप करत सांगितले की, “यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना एक मेसेज पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये कोणत्याही कलाकारचे नाव लिहिलेले नव्हते, तुमची फी सांगावी आणि राहुल गांधीसोबत 15 मिनिटे रॅलीमध्ये चालायचं.” असा आरोप केला असून कॉंग्रेस पक्षाने आरोपाचे पूर्णपणे खंडण केले आहे,आणि आमच्या पक्षाची केवळ बदनामी करत असल्याचे सांगितले आहे.

मात्र, हे प्रकरण अभिनेत्री पुजा भट्टला समजल्यानंतर ती चांगलीच नाराज झाल्याचे दिसून आले. भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत लिहिले की, “राहुल गांधी यांची यात्रा पुर्णपणे स्टेजमॅनेमेंट असून राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी आणि बोलण्यासाठी कलाकारांना पैसे पुरवले…हा त्याचा पुरावा आहे. सब गोलमान है भाई…ये पप्पू कभी पास नही होगा.” राणे यांच्या ट्वीटरला रिट्वीट करत पुजा भटने लिहिले की, “त्यांना नक्कीच असा विचार करण्याचा अधिकार आहे, आणि ते त्यांच्या मतांचा पूर्ण आदर करण्यास पात्र आहेत… पण मी इतर लोकांसोबत जगण्याआधी मला स्वतःसोबत जगावे लागेल. एक गोष्ट जी बहुसंख्य नियमांचे पालन करत नाही ती म्हणजे मानसाची विवेकबुद्धी.”

अभिनेत्री पुजा भट्टने भाजपचे नेते नितेश राणे यांच्यावर संताप व्यक्त करत सडेतोड उत्तर दिले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फटाके वाजवा रे! रश्मिका मंदान्ना अन् विजय देवरकोंडा अडकले विवाह बंधनात?
सुरभी चंदना सिंपल ग्लॅमरस लूक चाहत्यांना करतोय घायाळ, एकदा पाहाच फोटो

हे देखील वाचा