Tuesday, April 23, 2024

रवीनाने ‘एक दो तीन’ गाण्यावर डान्स करत माधुरीला दिले चॅलेंज; ‘धक धक गर्ल’ म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही  90च्या दशकातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनयासोबतच रवीना सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. दरम्यान, रवीनाचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती माधुरी दीक्षितच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. रवीनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

रवीना टंडन (raveena tandon) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रवीना 1988मध्ये आलेल्या ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अशात रवीनाला या गाण्यावर डान्स करताना पाहून लोक सोशल मीडियावर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. केवळ युजर्सच नाही, तर धक धक गर्लही कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि माधुरीने कमेंट करत लिहिले की, ‘ओह माय गॉड’.

रवीना टंडनने तिचा डान्स व्हिडिओ शेअर करताना माधुरी दीक्षितसाठी खास कॅप्शन लिहिले आहे. तिने लिहिले की, “शूटिंगदरम्यान सेटवर मजा! उशीराच का हाेईना पण जागतिक नृत्य दिनानिमित्त आपल्या आतल्या माधुरी दीक्षितला आव्हान देत आहे. सर्वांची राणी जिची कोणीही बरोबरी करू शकत नाही. माधुरी दीक्षित आय लव्ह यू.”

रवीना आणि माधुरीचे चाहते या व्हिडिओवर जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना अनेकांनी रवीनाला तिच्या सौंदर्याचे आणि वयाचे रहस्य विचारले आहे. एकाने कमेंट करत लिहिले, ‘लहानपणापासून तुम्हाला पाहत आलो आहे आणि तरीही तुम्ही अप्रतिम दिसता मॅडम.’ एकजण कमेंट करताे लिहितो, ‘माफ करा, पण तुम्ही म्हातारे कधी होणार.'(bollywood actress raveena tandon dance on superhit song ek do teen from tezaab movie madhuri dixit reaction video goes viral on social media)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सनी लिओनीची कातिल अदा, फिगर पाहून चाहते फिदा

“माझ्या चेहऱ्यावर असलेला आनंद” महाराष्ट्र शाहीर सिनेमातून अभिनयात पदार्पण करणाऱ्या सना शिंदेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा