‘मुँह से सुपारी निकाल के बात करने का रे बाबा’, सारा अली खानच्या व्हिडिओवर चाहत्याची मजेशीर कमेंट

Bollywood Actress Sara Ali Khan Gives Hilarious Commentary Before Wisdom Teeth Extraction Video See


बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान आपल्या जबरदस्त अभिनयासोबतच आपल्या अनोख्या अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर वावर असणाऱ्या कलाकारांमध्ये साराचाही समावेश आहे. ती आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. यांमुळे ती चर्चेचा विषय ठरत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. साराने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती दातांच्या डॉक्टरांकडे गेलेली दिसत आहे.

हा व्हिडिओ साराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये साराला पाहून काही चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिले की, ‘ग्यानी दात बाय बाय.’ यासह तिने कॉमेंट्री करत म्हटले की, “नमस्त प्रेक्षकांनो, माफ करा मला व्यवस्थित बोलता येत नाहीये. हसू येतंय आणि डॉक्टर शेट्टी आमच्यासोबत आहेत. ते माझ्या ज्ञानी दातांचे उद्घाटन म्हणणार होते, परंतु तो योग्य शब्द होणार नाही, त्याचा अर्थ लॉन्च करणे असा होतो. एक्स्ट्रॅक्शनला काय म्हणतात…? डॉक्टर राजेश शेट्टी जे तज्ज्ञ आहेत, ते माझे दात काढणार आहेत.”

सारा अली खान अडखळत्या आवाजात आपल्या आईसोबत केलेल्या डिनरबद्दल चर्चा करताना म्हणते की, औषधांमुळे ती झोपली होती. उठल्यानंतर ती कशीबशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, “नमस्ते मित्रांनो, माझी सर्जरी झाली. सर्वकाही व्यवस्थित झालं. धन्यवाद डॉक्टर शेट्टीजी.”

साराचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “आतापर्यंतची सर्वात भारी ऍक्टिंग. मला वाटते की तुम्ही अशाच प्रकारचे रोल केले पाहिजे.” दुसऱ्या एका चाहत्याने फिर हेरा फेरी चित्रपटातील डायलॉगचा वापर करत लिहिले की, “मुँह से सुपारी निकाल के बात करने का रे बाबा.”

साराच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाची शूटिंग करत होती. या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुषदेखील मुख्य भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त सारा ‘कुली नंबर वन’ या चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटात तिने अभिनेता वरुण धवनसोबत मुख्य भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.