Video: श्रेयस अय्यरने चहलची पत्नी धनश्री वर्मासह लावले ठुमके; स्टेप्स पाहून तुम्हीही जाल भारावून

Indian Cricketers Shreyas Iyer And Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance Video On Instagram Goes To Viral


भारतीय क्रिकेट संघाच्या इतर क्रिकेटपटूंच्या पत्नींप्रमाणेच फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी आणि यूट्यूबर धनश्री वर्मा ही अधिकच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो आणि डान्सचे व्हिडिओ चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. नुकताच तिचा एक भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबत ठुमके लावताना दिसत आहे.

हा व्हिडिओ अय्यरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस आणि धनश्री दोघेही जबरदस्त डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. त्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘आपल्या पायांबद्दल विचार करत आहे’. यासोबतच त्याने धनश्रीलाही टॅग केले आहे.

श्रेयसने किशला देखील या व्हिडिओमध्ये टॅग केले आहे, जो एक उत्तम छायाचित्रकार तर आहेच पण ‘एमजे ५’ या नामांकित गटनृत्याच्या संघाचा एक भाग देखील आहे. आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक लोकांनी हया व्हिडिओला पसंती दर्शविली आहे.

सदर व्हिडिओमध्ये हे दोघे एकमेकांसोबत सेंट जेएचएनच्या ‘रोसेस’ या गाण्यावर स्टेप डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओला अनेक क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकायची कोणतीच कसर धनश्री सोडत नाही. त्यामुळे आपल्या व्हिडिओमार्फत काहीतरी नवीन आणि वेगळेपणा दाखविण्याचा ती प्रयत्नांत ती असते.

फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा डेंटिस्टसोबतच व्यावसायिक कोरिओग्राफर आणि यूट्यूबरही आहे. धनश्रीचा डान्सशी निगडीत एक यूट्यूब चॅनेल आहे, ज्याला १५ लाखांपेक्षाही अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य श्रेयस अय्यर मागील काही काळापासून आपल्या दुखापतींमुळे क्रिकेटपासून दूर होता. परंतु आता तो विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई संघाने त्याला बुधवारी (१० फेब्रुवारी) वनडे मालिकेसाठी आपला कर्णधार म्हणून नेमले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात


Leave A Reply

Your email address will not be published.