Wednesday, February 21, 2024

मंदिरात गेल्याने ट्रोल करणाऱ्यांना साराने दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाली “माझ्या जीवनशैलीत…”

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिचा नवीन चित्रपट ‘गॅसलाइट‘ चित्रपटगृहात नाही, तर ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे. ‘गॅसलाइट’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली सारा गेल्या अनेक दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करत आहे. कधी अभिनेत्रीला तिच्या चित्रपटामुळे, तर कधी मंदिरात गेल्यामुळे साेशल मीडिया युजर्स ट्राेल करत आहे. सोशल मीडियावरील लोकांचे म्हणणे आहे की, साराने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच हिट चित्रपट दिले. मात्र, त्यानंतर एकतर तिचा चित्रपट ओटीटीवर रिलीज होतो किंवा फ्लॉप होतो. अशात आता साराने ट्रोलिंगबाबत मौन साेडले आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

सारा अली खान हिने (sara ali khan) माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ‘गॅसलाइट’च्या ओटीटी रिलीजबद्दल सांगितले आहे. सारा प्रेक्षकांच्या अपेक्षांबद्दल म्हणाली, “तिला हे सर्व समजत नाही आणि समजून घेण्याची इच्छाही नाही. तिचे काम केवळ दिग्दर्शकाकडून शिकणे आणि त्यानुसार काम करणे आहे.” बॉक्स ऑफिसवर चालणाऱ्या चित्रपटांच्या प्रश्नावर सारा अली खान म्हणाली, “आता कोणता चित्रपट चालणार हे कोणालाच माहीत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

सारा अली खान अनेकदा मंदिरात जाते. कधी अभिनेत्री केदारनाथ्च्या मंदिरात जाते, तर कधी महाकाल यांच्या मंदिरात जाते. मात्र, यामुळे अभिनेत्रीला अनेकदा ट्रोलिंगला बळी पडावे लागते. अशात या ट्रोलिंगवर अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितले की, “तिला या सर्व गोष्टींची पर्वा नाही. ती नुकतीच हिमाचल येथील महादेवच्या देवळात गेली होती. कदाचित लोक तिला याबद्दल ऐकवतील पण तिला याचा काहीही फरक पडत नाही.”

सारा अली खानने स्पष्टपणे उत्तर दिले आणि म्हणाली, “जर लोकांना माझ्या कामात काही अडचण असेल, तर ती माझ्यासाठीही समस्या असू शकते, पण माझ्या वैयक्तिक गोष्टी किंवा जीवनशैलीची समस्या असेल, तर मला काही फरक पडत नाही…!” असे अभिनेत्रीचे मत आहे. (Bollywood actress sara ali khan troll on her continuous temple visit sara gaslight movie ott release date)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉस सोडल्यानंतरही सुधरली नाही अर्चना गौतम, दुबईतील ‘या’ व्यक्तीला म्हणाली, ‘मार मार के…’

घटस्फाेटित अन् जीवनसाथी गमावलेल्या लोकांना उद्देशून दलजीतने लिहिली नाेट; म्हणाली, ‘समाज तुमचे मन…’

हे देखील वाचा