Sunday, December 3, 2023

इटलीच्या रस्त्यांवर शहनाज गिलचा लाेभस लूक, अभिनेत्रीची स्टाईल पाहून चाहते हैराण

बाॅलिवूड अभिनेत्री शहनाज गिलला ‘बिग बॉस 13‘ मधून खूप लोकप्रियता मिळाली. तिचे स्टारडम इतके वाढले आहे की, आता ती हिंदी चित्रपटसृष्टीतही मोठ्या पडद्यावर दिसू लागली आहे. अलीकडेच शहनाजचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान‘ प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला.

शहनाज गिल (shehnaaz gill) अभिनय क्षेत्रातही दमदार कामगिरी करत आहे, तसेच फॅशनमध्येही ती माेठ-मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकत आहे. शहनाजला तिच्या शैलीने चाहत्यांना कसे घायाळ करायचे हे चांगलेच ठाऊक आहे. अशात सध्या शहनाज तिच्या कामांमधून ब्रेक घेऊन परदेशात व्हेकेशन एन्जॉय करत आहे, ज्याचे फाेटाे साेशल मीडियावर चांगलेच व्हायरल हाेत आहे.

शहनाज गिलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर इटलीतील सुट्टीचे तिचे मनमोहक फोटो शेअर केले आहेत. अशात शाॅर्ट ड्रेसमध्ये शहनाज कधी बागेत, तर कधी रस्त्यावर पोझ देताना दिसत आहे, ज्यावर चाहते काैतुकाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचे फॅशन ब्रँडची अॅम्बेसेडर बनण्याचे नेहमीच स्वप्न होते, जे नुकतेच पूर्ण झाले आहे. या अभिनेत्रीची शुगर पॉप्सची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. अशात या यशाने शहनाज खूप खूश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाज गिलने जेव्हापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हापासून तिला चित्रपटांची ओढ लागली आहे. तिच्याकडे सध्या अनेक बॅक-टू-बॅक चित्रपट आहेत, त्यापैकी एक ‘100%’ आहे. यामध्ये ती जॉन अब्राहम, रितेश देशमुख आणि नोरा फतेहीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

शहनाज गिलने ‘किसी का भाई किसी की जान’या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या मल्टीस्टारर चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त सलमान खान, पूजा हेगडे, पलक तिवारी, राघव जुयाल आणि जस्सी गिल यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.(bollywood actress shehnaaz gill shares her gorgeous pictures in slit dress from italy vacation )

अधिक वाचा-
आदिपुरुषची ‘जानकी’ सार्वजनिक ठिकाणी करत होती स्मोकिंग, क्रिती सेनाॅने सांगितला ‘तो’ किस्सा
मोनालिसाच्या ‘त्या’ अंधारातील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले…

हे देखील वाचा