Monday, July 1, 2024

कडक उन्हाळ्यात शहनाज गिलने वाढवले ​​इंटरनेटचे तापमान, केले आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोशूट

बिग बॉस 13‘ मधून लोकप्रियता मिळवलेली शहनाज गिल आता कोणाच्याही परिचयावर अवलंबून नाही. तिचे स्टारडम इतके वाढले आहे की, आता ती हिंदी चित्रपटसृष्टीतही मोठ्या पडद्यावर दिसू लागली आहे. अलीकडेच शहनाजचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान‘ प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला.

चित्रपट प्रोजेकेट्सव्यतिरिक्त, शहनाज (shehnaaz gill) ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ होस्ट करते, ज्यामध्ये सिनेजगतातील अनेक स्टार्स सहभागी होतात. अशा प्रकारे शहनाजने अनेक प्लॅटफॉर्मवर आपले कौशल्य दाखवले आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आता या कामातून ब्रेक घेत शहनाजने बीचवर बोल्ड फोटोशूट केले आहे.

शहनाज गिल सध्या फुकेटमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. परदेशात उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत असलेल्या शहनाजने रेड कलरच्या मिनी ड्रेसमध्ये फोटो शेअर केला आहे. यादरम्यान शहनाज शार्ट ड्रेस आणि ओल्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

शहनाजचे मंत्रमुग्ध सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर काैतुकाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘समुद्र अधिक सुंदर दिसतो… आणि वाळू अधिक क्रिस्टल दिसते… कारण… आमची क्विन प्रत्येक गोष्ट खास बनवते.’, तर एकाने कमेंट करत लिहिले, ‘समुद्राला आग लावली.’ याशिवाय अनेक युजर्सनी शहनाजच्या या फाेटाेंवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाज ही पंजाबी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. ‘हौसला रख’, ‘कला शाह कला’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. त्याचबरोबर ‘किसी का भाई किसी की जान’ नंतर शहनाजकडे साजिद खानचा ‘100 परसेंट’ असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात ती नोरा फतेही, रितेश देशमुख आणि जॉन अब्राहसाेबत स्क्रिन शेअर करणार आहे. (bollywood actress shehnaaz gill shares bold photoshoot photos from beach side in phuket )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चन अन् अनुष्का हेल्मेटशिवाय गेले दुचाकीवर, युजर्सने कारवाईची मागणी करताच मुंबई पाेलिसांनी दिली प्रतिक्रिया

राखी सावंतला पती आदिलपासून धोका! ड्रामाक्वीन म्हणाली, ‘तुरुंगात असून तो मला मारण्याचा…’

हे देखील वाचा