Sunday, May 19, 2024

राखी सावंतला पती आदिलपासून धोका! ड्रामाक्वीन म्हणाली, ‘तुरुंगात असून तो मला मारण्याचा…’

ड्रामा क्वीन राखी सावंत कायमच काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असते. अशात अभिनेत्रीने पती आदिल खान दुर्रानीवर नवे आरोप केले आहेत. राखीचे म्हणणे आहे की, तिचा पती आदिल दुर्रानी तिला मारण्याचा कट रचत आहे आणि ताे स्वतः तुरुंगात असल्याने त्याने एका व्यक्तीला तिला मारण्याची सुपारी दिली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

राखी सावंत (rakhi sawant) हिचा पती आदिल(adil durrani) सध्या म्हैसूर तुरुंगात बंद आहे. अशात आता राखी सावंतने खुनाचा कट रचल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. माध्यमाशी केलेल्या संभाषणात राखीने सांगितले की, ‘ती शत्रूंपासून दूर राहण्यासाठी प्रार्थना करत आहे. आदिल मला मारण्याचा कट रचत आहे. माझ्या मृत्यूचा सुपारी त्यांनी तुरुंगातील एका व्यक्तील दिला आहे.’

राखी पुढे म्हणाली, ‘मला खात्री आहे की, अल्लाह माझी प्रार्थना स्वीकारेल.’ राखी सावंत पती आदिलला उद्देशून म्हणाली की, ‘तू मला मारू शकत नाहीस, तुला असं का करायचं आहे? मालमत्ता आणि बदला घेण्यासाठी?’ राखीने असेही सांगितले की, ‘तिला रोज आदिलचा फोन येतो आणि तो तिला रोज सांगतो की, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला परत घेऊन जा. मात्र, मी त्याला सांगितले आहे की, मी तुला माफ केले आहे, पण माझ्यापासून दूर राहा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखीने एक व्हॉईस नोट देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती राखीला अलर्ट करताना दिसत आहे. ती व्यक्ती म्हणते, “मला जे कळले ते मी तुम्हाला सांगत आहे, मी तुमचा शुभचिंतक आहे आणि मला माझी ओळख लपवायची आहे. आदिलच्या बॅरेकमध्ये काही लोक आहेत, ज्यांच्याशी तो तुम्हाला मारण्याचा सौदा करत होता. या महिन्याच्या शेवटपर्यंत आदिलला कधीही जामीन मिळू शकतो.” असे राखीच्या शुभचिंतकने एका व्हाॅईस नाेटमध्ये सांगितले.(tv actress rakhi sawant blamed husband adil durrani that he gave supari to kill me)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमृता खानविलकरने शेअर केला ‘मस्तानी’ लूक, फाेटाे व्हायरल

तांत्रिक अडचणींमुळे ‘चाैक’ चित्रपटाच्या प्रदर्शनात माेठा बदल, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट

हे देखील वाचा