Sunday, April 19, 2026
Home बॉलीवूड वियानच्या वाढदिवसानिमित्त शिल्पाने शेअर केला खास व्हिडिओ, चाहते हसून-हसून लाेटपाेट

वियानच्या वाढदिवसानिमित्त शिल्पाने शेअर केला खास व्हिडिओ, चाहते हसून-हसून लाेटपाेट

बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा विआन आज म्हणजेच रविवारी (21 मे)ला त्याचा 11वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात अभिनेत्रीने मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक जुना आणि खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विआन त्याच्या आईला एक खास जादू दाखवताना दिसत आहे, ज्याचा शिल्पा खूप आनंद घेत आहे. काय आहे नेमके व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊया…

शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिचा मुलगा विआनने या व्हिडिओमध्ये पायात टॉवेल गुंडाळला आहे. व्हिडिओची सुरुवात मुलाच्या फनी इंट्रोडक्शनने होते, ज्यानंतर विआन म्हणताना दिसताे की, ‘माझे दोन्ही पाय जमिनीवर आहेत, बरोबर? मात्र, आता मी ते हवेत उडवणार.’ यानंतर विआनचे शूज जमिनीवरून थोडेसे वर येताना दिसते, जेव्हा ताे त्याचे पाय टॉवेलच्या मागून उचलताे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिले की, ‘मला हा जुना व्हिडिओ खूप आवडतो. माझ्या प्रिय विआन तू जादूगार आहेस आणि तू आमच्या सर्वांच्या जीवनात चमक आणलीस. माझ्या मुला, मला निवडल्याबद्दल धन्यवाद. एक आदरणीय नातू, प्रेमळ मुलगा, जासूस पाजी आणि विश्वासू मित्र म्हणून तुझा गौरव आहे. माझ्या बाळाला 11 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.”

मुलगा विवानच्या वाढदिवसानिमित्त राज कुंद्रानेही एक खास पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माझा रॉकस्टार, माझे जीवन, माझ्या मुला, माझा विश्वास बसत नाही की तू 11 वर्षांचा आहेस. दररोज तुम्ही आमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत जोडता. तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो.’ अशाप्रकारे राज कुंद्राने पाेस्ट शेअर करुन मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.(Bollywood actress shilpa shetty wished vian on his birthday by sharing an unseen video )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅकलेस ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बाेल्ड अंदाज, फाेटाे व्हायरल

इलियाना डिक्रूझने प्रेग्नंसीमध्ये लुटला लाँग ड्राईव्हचा आनंद, चाहते म्हणाले, ‘बाळाचा बाप काेण?’

हे देखील वाचा