Friday, December 1, 2023

ब्रेकिंग! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा तीव्र झटका

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशातच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने वडिल सुबीर सेनबद्दल काही गोष्टी लिहिल्या आहेत. तसेच, या पोस्टद्वारे तिने सांगितले आहे की, तिला यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता.

खरे तर, सुष्मिता सेन (sushmita sen) हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने सर्वप्रथम तिच्या वडिलांच्याबद्दल लिहिले आहे. अभिनेत्री म्हणाली, “तुमचे हृदय आनंदी आणि धैर्यवान ठेवा आणि जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज, असेल तेव्हा ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. (माझे वडील सुबीर सेन यांचे सुज्ञ शब्द).” वडिलांचे हे शब्द सांगितल्यानंतर अभिनेत्रीने तिला यापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

हृदयविकाराच्या झटक्याची माहिती शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, “मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. अँजिओप्लास्टी झाली आहे, स्टेंट बसवला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ञांनी मला सांगितले आहे की, ‘माझे हृदय मोठे आहे.'” अभिनेत्रीने पुढे लिहिले, “मी अनेक लोकांचे वेळेवर मदत आणि तत्पर कारवाईसाठी आभार मानू इच्छिते. या लोकांसाठी मी दुसरी पोस्ट शेअर करेन. ही पोस्ट फक्त माझ्या शुभचिंतक व जवळच्या प्रियजनांसाठी आहे. आता मी अगदी मस्त आहे ही आनंदाची बातमी मला तुम्हाला द्यायची होती. मी पुन्हा आयुष्य जगण्यासाठी तयार आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.”

अभिनेत्रीच्या या पाेस्टनंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला ‘तू लवकर बरी हाे आणि तुझी काळजी घे’ अश्या कमेंट करत आहेत. मात्र, मंडळी आम्ही तुम्हाला सांगताे, वयाच्या 47 व्या वर्षीही अभिनेत्री तिच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेते. ती अनेकदा व्यायाम करताना दिसते. अभिनेत्री तिचे फिटनेस संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असते.(bollywood actress sushmita sen had a heart attack angioplasty done shared a post on instagram and also write about her father )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानीने टायगर श्रॉफच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…,’

मोठी बातमी! शाहरुख खानची पत्नी ‘गौरी खान’ यांची अडचण वाढणार….लखनऊमध्ये FIR दाखल, नेमक काय आहे प्रकरण?

हे देखील वाचा