Friday, June 13, 2025
Home कॅलेंडर birthday| एली मॅगझीनमध्ये झळकणारी पहिली अभिनेत्री उदिता गोस्वामी आज आहे बॉलिवूडपासून लांब

birthday| एली मॅगझीनमध्ये झळकणारी पहिली अभिनेत्री उदिता गोस्वामी आज आहे बॉलिवूडपासून लांब

बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी झोतात आलेली उदिता गोस्वामी (दि, 9 फेब्रुवरी) रोजी आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. उदिताने कमीत कमी 3 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्रीने वयाच्या 16 व्या वर्षापासूनच रॅंप वॉक करायला सुरुवात केली होती आणि नंतर तिने मॉडेलिंगमध्येच करिअ बनवलं. त्याशिवाय तिने एमटीव्ही मॉडेल मिशन स्पर्धाही जिंकली ज्यानंतर तिची मोजनी टॉप मॉडेलमध्ये होऊ लागली.  एली मॅगझीन मध्ये झळकणारी पहिली अभिनेत्री म्हणून उदिताला ओळखलं जातं.

अभिनेत्री उदिता गोस्वामी (Udita Goswami) हिने अभिनेता जॉन अब्राहम (john Abraham) सोबत ‘पाप’ (paap) चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून चित्रपटाची निर्मिती पुजा भट्ट (Pooja Bhatt)ने केली होती. यानंतर अभिनेता इमरान हाशमी (Emraan Hashmi) याच्यासोबत ‘जहर’ (Zeher) चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. यानंतर तिने ‘अक्सर’ (Aksar) चित्रपटामध्ये डिनो मोरिया (Dino Moreya)  मुख्य भूमिकेत होती तर इमरान खलनायकी भूमिकेत पाहायला मिळाला. यामध्ये उदीताने खूप बोल्ड सीन दिले होते त्याशिवाय बॉक्सऑफिसवर चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. अक्सर चित्रपटाच्या यशानंतर उदीताने 3 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र, यानंतर अभिनेत्रीचे चित्रपट फार यशस्वी ठरले नाही. 2012 साली अदीताचा शेवटचा चित्रपट ‘डायरी ऑफ बटरफ्लाई’ प्रदर्शित झाला होता मात्र, हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दनक्यात आपटला.

साल 2013 साली उदीताने तिचा बॉयफ्रेंड मोहित सुरी (Mohit Suri) याच्यासोबत लग्न बंधनात अडकली. हे दोघे अनेक दिवसांपसून एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर अभिनेत्रीने फिल्मी करिअरला नेहमीसाठी पुर्णविराम लावला. आता अदीता अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि पुजा भट्टची वहिनी आहे. अभिनेत्रीला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुलं आहेत. सध्या उदिता आपलं वैवाहिक आयुष्य आनंदात जगत आहे.

 

View this post on Instagram

 

2018 साली उदीताचं कॉल डेटा रिकॉर्ड या स्कॅमशी नवी जोडलं गेलं ज्यानंतर अभिनेत्री पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली होती. या स्कॅमच्या लिस्टमध्ये अनेक कलाकारांचे नाव आले होते मात्र, उदीताच्या नावामुळे प्रकरण खुप गाजलं होतं. त्यासोबतच उदीतीला पोलिस्टेशनचे हेल्पाट्या माराव्या लागल्या होत्या. तुम्ही एकूण हैराण व्हाल पण उदीताने कायद्याने मोहित सूरूची कॉल रेकॉर्डींग काढली होती. त्याशिवाय या कामासाठी तिने खाजगी गुप्तहेराची मदत घेतली होती.

उदीता अभिनेत्रीसोबतच एक प्रोफेशनल डीजे आहे. तिने ग्रॅजवेशन पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री मुंबईमध्ये आली होती. तिने चित्रपटांपूर्वी अनेक जाहिरतींमध्ये काम केले होते. उदीताने पेप्सी आणि टाइटन या अव्यवसायिक जाहिराती देखिल केल्या होत्या. उदीताला चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. ज्यानंतर तिला ‘पाप’ हा पहिला चित्रपट मिळाला. यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले असून तिला ‘जहर’ आणि ‘अक्सर’ या चित्रपटांसाठी साइन केले.

 

View this post on Instagram

 

उदीताने अक्सर चित्रपटामध्ये खूप बोल्ड सीन दिले होते ज्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये टॉपची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखू लागले. सध्या अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे मात्र, सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सोशल मीडियावर उदीताचा मोठा चाहतावर्ग आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘दुसऱ्याला पण घटस्फोट देणार’, ट्रोलरच्या कमेंटवर टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचे सणसणीत प्रत्युत्तर
आदिल दुर्रानीच्या अटकेनंतर राखी सावंतच्या पूर्व पतीची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तु ज्या वेदनांचा सामना करतेस…’

हे देखील वाचा