Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड उर्वशी रौतेलाचा बंजारा लूक व्हायरल; व्हिडिओ पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका!

उर्वशी रौतेलाचा बंजारा लूक व्हायरल; व्हिडिओ पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका!

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी कधी चित्रपट, तर कधी म्युझिक व्हिडिओ किंवा लेटेस्ट फोटोशूटच्या माध्यमातून चर्चेत राहत असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसाठी तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दरम्यान, उर्वशीने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात चाहत्यांना तिचा पूर्णपणे वेगळा लूक पाहायला मिळाला आहे. चाहते उर्वशी रौतेलाच्या या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

या व्हिडिओमध्ये उर्वशी बंजारा लूकमध्ये घोड्यासह फिरताना दिसत आहे. यावेळी उर्वशीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. व्हिडिओमधील अभिनेत्रीचे एक्सप्रेशन्स अगदी पाहण्यासारखे आहेत. हा व्हिडिओ काही तासांतच 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. चाहते व्हिडिओवर प्रतिक्रिया देत, नेहमीप्रमाणे उर्वशीचे कौतुक करत आहेत.

उर्वशीने 2012 मध्ये आयएमसी- मिस इंडियाचा मुकुट आपल्या नावावर केला होता. त्यांनतर 2013 साली आलेल्या ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या व्यतिरिक्त ती 2016 मध्ये आलेल्या ‘सनम रे’ चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटात उर्वशीसोबत यामी गौतम आणि पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत होते.

उर्वशी रौतेला नुकतीच ‘एक लडकी भीगी भागी सी’ या गाण्यात दिसली होती. ती सध्या मोहन भारद्वाजच्या ‘ब्लॅक रोज’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा तिचा पहिला द्विभाषिक चित्रपट असेल जो प्रसिद्ध लेखक शेक्सपियरचे नाटक ‘द मर्चंट ऑफ वेनिस’ वर आधारित आहे. यापूर्वी तिचा ‘व्हर्जिन भानुप्रिया’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. तसेच, तिचे नवीन व्हिडीओ गाणे ‘वो चांद कहा से लाओगी’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात ती टीव्ही स्टार मोहसिन खान सोबत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हरियाणवी गायिका रेणुका पवारच्या गाण्याने वाढवला यूट्यूबचा पारा, व्हिडिओत दिसतेय एकदम कडक

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

हे देखील वाचा