उर्वशी कान पकडून कुणाला म्हणाली, ‘राजाजी?’ व्हिडिओचा इंटरनेटवर धुमाकूळ

0
43
urvashi-rautela
Photo Courtesy: Youtube/Akash Daphal

मेगास्टार चिरंजीवी आणि रवी तेजा यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘वॉल्टेअर वीरैया’ मधील ‘बॉस पार्टी’ हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे चिरंजीवी आणि उर्वशी रौतेला यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गाण्याचे बोल, सूर आणि कोरिओग्राफी लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

युजर्सने केले उर्वशीच्या डान्सेच काैतुक
‘बाॅस पार्टी’ (boss party) हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या गाण्याला अवघ्या एका तासात यूट्यूबवर 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘बॉस पार्टी’ या गाण्यातील उर्वशी (urvashi rautela) हिच्या डान्सने ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ओ अंतवा’ (o antava) या प्रसिद्ध गाण्यातील सामंथा (samantha) हिच्या डान्सवर भारी पडला आहे. युजर्स या गाण्याच्या व्हिडिओवर कमेंट करून उर्वशीच्या डान्सचे कौतुक करत आहेत.

‘वॉल्टेयर वीरैया’ हा चित्रपट 2023ला हाेणार सिनेमागृहात प्रदर्शित
माध्यमातील वृत्तानुसार, एस रवींद्र दिग्दर्शित ‘वॉल्टेयर वीरैया’ हा चित्रपट पुढील वर्षी 2023 मध्ये संक्रांतीच्या सणावर प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरबद्दल सांगायचे झाले तर, चिरंजीवीच्या चित्रपटात ते सर्व एलिमेंट असतील, जे त्यांचे चाहते त्यांच्या चित्रपटांमध्ये पाहण्यास येतात.

चित्रपटात श्रुती हासनही दिसणार महत्वाच्या भूमिकेत
या चित्रपटात चिरंजीवीसोबत श्रुती हासनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जर आपण चित्रपटाच्या प्रत्येक पैलूबद्दल बोललो तर तो पूर्णपणे एक ऍक्शन मनोरंजन करणारा चित्रपट आहे. ज्याची निर्मिती नवीन येरनेनी आणि  मॅथरी मूवी मेकर्सचे वाय रविशंकर यांनी केली आहे, तर GK मोहन सहनिर्माते आहेत. निरंजन देवरामन या चित्रपटाचे संपादक आहेत, तर सुष्मिता कोनिडेला त्याची कॉस्च्युम डिझायनर आहेत. (bollywood actress urvashi rautela song boss party has come to give tough competition to samantha o antava)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता!! सलीम खान त्यांच्या मोकळ्या वेळात अर्धा-अर्धा तास बोलायचे राँग नंबरवर, पाच मुलांमुळे वाढले होते खूपच काम

ऐश्वर्या-सलमान खानच्या ब्रेकअपवर सलीम खान यांनी दिली होती प्रतिक्रिया, सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here