Thursday, June 13, 2024

‘आयएएस’ अधिकारी बनण्याचा केला होता निश्चय, पण नशिबाने धरली वेगळीच वाट; ‘असा’ आहे यामीचा प्रवास

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ही एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने खूप कमी वेळात छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास केला आहे. सुरुवातीला काही जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केलेली यामी आज बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरमध्ये तिच्या मेहनतीने खूप कमी वेळात नावलौकिक मिळवले आहे. अशातच रविवारी (२८ नोव्हेंबर) यामी तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी…

यामीचा जन्म २८ नोव्हेंबर, १९८८ मध्ये हिमाचल प्रदेशात झाला होता. तिचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी चित्रपटाचे दिग्दर्शक होते. यामीला लहानपणापासून आयएएस बनायचे होते, परंतु जस-जशी ती मोठी होत गेली, तशी तिची आवड बदलली आणि तिने अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. (Bollywood actress yami gautam celebrate her birthday, let’s know about her life)

हेच स्वप्न डोळ्यात घेऊन तिने ती २० वर्षांची असताना तिचे शहर सोडले आणि ती मुंबईला आली. तिने टेलिव्हिजनवरील मालिका ‘चाँद के पार चलो’ मधून अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकले. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर २००८ साली तिने मल्याळम ‘उल्लास उत्साह’ या चित्रपटात काम करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर लवकरच तिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले. तिने २०१२ साली ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होता.

या चित्रपटात तिने एका बंगाली मुलीचे पात्र निभावले होते. तिचे पात्र आणि अभिनयाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट चांगलाच गाजला होता. यानंतर तिने हिंदी, मल्याळम, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि मराठी भाषेतील अनेक चित्रपटात काम केले. यामध्ये ‘नूर’, ‘गौरवम’, ‘युद्धम’, ‘ऍक्शन जॅक्सन’, ‘बदलापूर’, ‘काबिल’, ‘सरकार’, ‘उरी: द सर्जिकाल स्ट्राईक’ आणि ‘बाला’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश होतो. यामीने खूप कमी कालावधीत अभिनय क्षेत्रात तिने नाव उंचावले आहे.

चित्रपटासोबतच यामी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तिने ४ जून, २०२१ साली ‘उरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासोबत लग्न केले आहे. या लग्नाची तिने कोणालाही कसलीच कल्पना दिली नव्हती. तिने केवळ तिचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत तिचा लग्न सोहळा पार केला आहे. लग्नानंतर तिने फोटो शेअर करून ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. या बातमीने तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला होता. तसेच लग्नात यामीने तिच्या आईच्या लग्नातील साडी नेसली होती, त्यामुळे देखील ती खूप चर्चेत होती. यामी तिच्या ‘दसवीं’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…त्यामुळेच मी एकटे झोपण्यासाठी घाबरायची’, अभिनेत्री ईशा गुप्ताही झाली होती ‘कास्टिंग काऊच’ची शिकार

-‘या’ हॉलिवूड सिंगरकडे पाहून बप्पी दा झाले होते प्रभावित, विचार करायचे, ‘माझ्याकडेही पैसा असता…’

-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा