Saturday, July 27, 2024

प्रसिद्ध कलाकरांचे लग्ने का तुटतात? झीनत अमानने सांगितले कारण, केला धक्कादायक खुलासा

बॉलीवूडची बोल्ड अॅन्ड ब्यूटीफुल अभिनेत्री झीनत अमान यांनी 70 च्या दशकात मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. झीनत या हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी इंडस्ट्रीत आधुनिकतेची ओळख करून दिली. ‘हलचल’ चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण करणाऱ्या झीनत यांनी ‘हरे रामा हरे कृष्णा’मध्ये देव आनंद यांच्या बहिणीची भूमिका साकारून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय मिळवली. या चित्रपटासाठी झीनत यांना सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अशा प्रकारे, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा जास्त दमदार चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, झीनत यांनी मजहर खानशी लग्न केले, जे टिकू शकले नाही.

71 वर्षीय झीनत अमान (zeenat aman) सध्या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. झीनत अमान पडद्यावर खूप यशस्वी झाल्या असल्या तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य तितकेच अपयशी ठरले. झीनतला त्यांच्या नात्यात खूप फसवलं गेलं. त्यांच्या आयुष्याबद्दल बाेलताना अभिनेत्री सांगतात, “लग्न करून सतत त्रासात राहण्यापेक्षा लग्न न केलेलेच बरे.”

एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा झीनत अमान यांना विचारण्यात आले की, “फिल्म इंडस्ट्रीमध्ये बहुतांश लग्न का टिकत नाहीत? “या प्रश्नाच्या उत्तरात ज्येष्ठ अभिनेत्री म्हणाल्या की, “असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी वर आकाशात बांधल्या जातात. जर ते टिकायचे असेल तर नक्कीच टिकेल. पण जर ते टिकले नाही, तर ते आपल्या नशिबात नव्हते, म्हणून ते पुर्ण नाही झाले. मला वाटते की, मी खूप आनंदी आहे.”

चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींबद्दल बोलताना झीनत अमान म्हणाल्या, “लोकांना एक गोष्ट समजत नाही की, जेव्हा कलाकार लग्न करतात तेव्हा ते त्यांचे लग्न यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतात. कारण, ते लग्न करतातच याच्यासाठी की, ते लग्न करण्यास इच्छूक असतात. मी अश्या काही मुलींना ओळखते, ज्या अशा अनेक गोष्टी करतात जाे सामान्य माणूस कधीच करू शकत नाही.” झीनत अमानचे मत आहे की, “लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्रासात राहण्यापेक्षा अविवाहित राहणे चांगले.”

झीनत अमान यांच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘डाॅन’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘राेटी कपडा और मकान’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (bollywood actress zeenat aman on bollywood stars marriage veteran actress define how we are different from common people)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हे तीन वेगळे सण असतात’ शशांक केतकरने ‘होळी’च्या ‘त्या’ पोस्टमधून घातले लोकांच्या डोळ्यात अंजन

‘तारक मेहता’ वयाच्या 42 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात, इंटिरियर डिझायनर चांदनीसोबत थाटला संसार

हे देखील वाचा