Tuesday, March 5, 2024

लग्न न करता देखील ‘या’ अभिनेत्री जगतात सुखाचे आयुष्य, वाचा संपूर्ण यादी

भारतीय समाजात लग्नावर जास्त महत्व दिले जाते. त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये अशा काही सुंदरी आहेत ज्या लग्नाशिवाय आनंदी आहेत. स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणाऱ्या या अभिनेत्री आहेत. बॉलीवूडच्या अशाच काही सौंदर्यवतींबद्दल आज जाणून घेऊया.

या यादीत पहिले नाव आहे तब्बूचे.(Tabbu) ही 51 वर्षांची सुंदर अभिनेत्री आनंदी जीवन जगत असून अनेक हिट चित्रपटही करत आहे. तिला तिच्या आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. ‘दृश्यम 2’ आणि ‘भोला’ सारखे ‘अस्तित्व’ आणि ‘चांदनी बार’ सारखे हिट चित्रपट देणारी तब्बू तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे.

सुष्मिता सेन (Sushmita sen) बॉलीवूडमध्ये तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. ‘मिस युनिव्हर्स’ झालेली ही अभिनेत्री आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगते. सुष्मिताचे अद्याप लग्न झालेले नाही आणि ती आपल्या दोन मुलींसोबत आनंदी जीवन जगत आहे.

अभिनेत्री अमिषा पटेलला (Amisha patel) बॉलिवूडमध्ये कोणत्याही ओळखीची गरज नाही. ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अमीषाने आजपर्यंत लग्न केलेले नाही आणि तिला तिच्या निर्णयाचा कोणताही पश्चाताप नाही. अमीषा पटेल 2023 मधील सर्वात हिट चित्रपट ‘गदर 2’ मध्ये दिसली होती.

सदाबहार अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांनीही कधीही लग्न केले नाही आणि त्याबद्दल त्यांना कोणतीही खंत नाही. अभिनेत्रीने नुकतेच तिचे चरित्र लिहिले, ज्यामध्ये तिने म्हटले की, ‘लग्न तिच्या नशिबात नव्हते. तिच्या आईला तिच्यासाठी बरेच दावेदार सापडले पण तिच्याबरोबर गोष्टी कधीच घडल्या नाहीत आणि मला याबद्दल खेद नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

जेव्हा सलमान खान प्रीतीला म्हणाला होता परफेक्ट मॅरेज मटेरियल मानत, तेव्हा बिग बी म्हणाले…
जेव्हा सेटवर स्टंट करताना सैफ अली खानला पडले १००पेक्षा अधिक टाके, प्रीती झिंटाने दिली होती साथ

हे देखील वाचा