Friday, April 19, 2024

शिल्पा शेट्टीने केला तिच्या शाळेच्या दिवसातील फोटो शेअर, सोबत दिले ‘हे’ खास कॅप्शन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांशी शेअर करत असते. त्यासोबतच ती अनेक सामाजिक उपक्रमातही आपली उपस्थिती दर्शवत असते. तिचा असाच एक सामाजिक संदेश देणारा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमका काय आहे हा संदेश चला जाणून घेऊ.

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) आपल्या चाहत्यांना अनेक बाबतीत प्रोत्साहित करताना दिसून येत असते. सोबतच ती आपल्या मुलांचे म्हणजे विहान आणि समीशाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र यावेळी तिने आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने आपला शालेय जीवनातील एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कोरोनामुळे होणार्‍या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे सोबतच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचा संदेश दिला आहे.

या व्हायरल फोटोमध्ये शिल्पा शेट्टी शाळेच्या गणवेशात आपल्या मैत्रिणीसोबत उभी असून स्मितहास्य करताना दिसत आहे. यावेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाबद्दल बोलताना ती म्हणते की ” मला वाईट त्या मुलांच वाटत जे या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. ते आपल्या मित्रांसोबत खेळू शकत नाहीत ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. परंतु या परिस्थितीत दुसरा कोणता पर्याय नाही. त्यांना आपण या रोगाच्या संपर्कात सुद्धा नेऊ शकत नाही. मात्र हे नुकसान भरून काढण्यासाठी नवीन उपाय शोधले पाहिजेत.”

यावर पुढे बोलताना शिल्पा शेट्टी म्हणते की, “आपल्याला पाऊले उचलण्याची गरज आहे म्हणूनच आजच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त आपण सगळे एकत्र येऊया फक्त आपल्या मुलांसाठी नव्हेतर प्रत्येक मुलासाठी. ज्यामुळे त्यांना सुरक्षित शिक्षणाची संधी मिळेल.”

शेवटी येणार्‍या मजबूत पिढीसाठी सुरक्षित रहा, निरोगी रहा असा संदेशही तिने दिला आहे. दरम्यान शिल्पा शेट्टीने  ‘हंगामा 2’ या चित्रपटात काम केले होते. यामध्ये तिच्यासोबत परेश रावल, मीजान आणि प्रणिता सुभाष यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘इंडीयाज गॉट टॅलेंट’मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे.

हे देखील वाचा