×

क्या बात है! कॅटरिना कैफने शेअर केले तिचे बोल्ड आणि आकर्षक फोटो

बॉलिवूडची अभिनेत्री कॅटरिना कैफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत फॅन्सचं संपर्कात असते. कॅटरिनाला सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोविंग आहे. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही बोल्ड फोटोज शेअर केले असून, ते फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहेत. तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया ते कमेंटमध्ये सांगताना देखील दिसत आहेत. कॅटरिनाने तिचे मालदीववरून काही फोटो शेअर केले असून, ती समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसत आहे.

कॅटरिनाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तिने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “माय हॅप्पी प्लेस” अर्थात माझी आनंदाची जागा. याआधी देखील तिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा शर्ट घातला होता, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. हे फोटो तिने इंदोरमधून पोस्ट केले होते. या फोटोंवर तिच्या फॅन्ससोबत नेहा धुपिया, डायना पॅंटी आदी कलाकारांनी देखील कमेंट करत तिच्या सौंदर्याचे आणि लूकचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कॅटरिनाच्या या फोटोंना आतापर्यंत २५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले असून, भरपूर लोकांनी कमेंट केल्या आहेत. कमेंट्समध्ये तिला हार्ट, फायर ईमोजी बऱ्याच चाहत्यांनी पोस्ट केल्या असून, काहींनी कौतुकाने तिला ‘राणी’ देखील म्हटले आहे. मागच्या महिन्यात ९ डिसेंबर रोजी कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानच्या माथेपुर पॅलेसमध्ये लग्न केले. हे लग्न अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि गुप्तपणे करण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कॅटरिना आणि विकी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास कॅटरिना सध्या सलमान खानसोबत ‘टायगर ३’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर विकी फिल्ड मार्शल सॅम माणेक शॉ यांच्या जीवनावर आधारित मेघना गुलजार यांच्या ‘सॅम बहादुर’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. फॅन्सला लवकरच कॅटरिना आणि विकी यांना एकत्र सिनेमात बघण्याची खूप इच्छा आहे.

हेही वाचा :

Latest Post