Tuesday, November 18, 2025
Home बॉलीवूड तब्बल 17 वर्षानंतर खिलाडी कुमार आणि दबंग खानने एकत्र लावला ठुमका, पाहाच व्हायरल व्हिडिओ

तब्बल 17 वर्षानंतर खिलाडी कुमार आणि दबंग खानने एकत्र लावला ठुमका, पाहाच व्हायरल व्हिडिओ

खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार आणि दबंग खान म्हणजेच सलमान खान हे दोघेही बॉलिवूडचे स्टार आहेत. सलमानने आपल्या करिअरची सुरुवात 1988 साली केली होती तर अक्षयने त्याच्या 3 वर्षानंतर अभिनय क्षेत्रामध्ये पाउल ठेवलं होतं. नुकतंच अक्षयचा नवीन चित्रपट ‘सेल्फी‘ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच त्यामधील जुनं गाणं ‘मै खिलाडी तु अनाडी‘ त्याचंच रिमेक या पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आलं असुन चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर गाण्याने क्रेज मिळवली आहे. अशातच सलमान आणि अक्षयने या गाण्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो तुफाना व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सलमान खान (Salman Khan) हे गार्डनमध्ये बसून एक गाणं बघतात. या गाण्याला बघितल्यानंतर दोघेही उठतात आणि धमाकेदार डान्स करतात. त्यांची एनर्जी पाहून वाटणारच नाही की, या दोघांचीही 50 उलटली आहे. व्हिडिओ पाहून दोघांच्याही चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं असून व्हिडिओला तुफान व्हायरल केलं आहे.

अक्षय आणि सलमान यांनी 80-90 च्या दशकामधील आपल्या करिअरची सुरुवात केली असून दोघांच्याही कष्टाला मोठं यश मिळालं आहे आणि आज इंडस्ट्रीमध्ये मोठं स्थान निर्माण केलं आहे. 2004 साली प्रदर्शित ‘मुझसे शादी करोगी‘ या चित्रपटामध्ये अक्षय आणि सलमानची जोडी पाहायाला मिळाली होती. त्यांनी 2 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. तब्बल 17 वर्षानंतर या व्हिडिओमुळे ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

मुझसे शादी करोगी या चित्रपटापासूनच यांची चांगली मैत्री झाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले असून बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घातला होता. सलमान आणि अक्षयने यानंतर ‘जानेमन’ या चित्रपटामध्येही एकत्र काम केलं होतं. यामध्ये प्रीति जिंटा मुख्य भूमिकेत होती. दिग्दर्शक शिरिष कुंदर यांच्या बॉलिवूड करिअरमधील हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानच अक्षय आणि सलमानमध्ये वाद निर्माण झाला होता.

वाद एवढा वाढला होता की, सलमानने अक्षयवर भूमिका काढून घेण्याचाही आरोप लावला होता. त्यावेळी एका मुलाखतीदरम्यान अक्षयने सांगितले होते की, “हा मी सलमानची भूमिका काढून घेण्याचा प्रयत्न केला होता पण मी असं करु शकलो नाही. कारण सलमानने एवढं भरी काम केलं आहे. तर मी त्यामध्ये अशस्वी झालो.” सांगायचं झलं तर सलमानने आजपर्यत अनेक गाजणारे चित्रपट दिले आहेत ज्यामुळे अभनेता आज एवढा मोठा स्टार आहे
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
एकमेकांना भाऊ- बहीण मानणाऱ्या लता मंगेशकर आणि दिलीप कुमारांमध्ये ‘या’ कारणाने आला होता दुरावा, 13 वर्षे…
…म्हणून लता मंगेशकर अविवाहित असूनही लावत होत्या कुंकू, गानकोकीळेच्या आयुष्यातील ‘त्या’ घटनेचा झाला खुलासा

हे देखील वाचा