प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे सरोगसी आई-बाबा बनले. दोघांनीही आनंदाने ही बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली. प्रियांकाने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून निक जोनासला टॅग करत अशी पोस्ट केले की, “आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, आम्ही सरोगसी माध्यमातून आई-वडील झालो. आता थोडावेळ आम्ही आमच्या परिवारासाठी काढला आहे ! प्रियांका-जोनास बरोबरच असे काही बॉलिवूड कपल्स आहेत जे सरोगसी आई-बाबा झाले आहेत.
प्रीति जिंटा-जीन गुडइनफ :
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती जिंटा – जीन गुडइनफ यांनी २०२१ मध्ये घोषणा केली की, ते सरोगसी पद्धतीने दोन जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले आहेत. प्रीतिने मुलाचं नाव जय आणि मुलीचे नाव जिया ठेवले आहे.
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा
अभिनेत्री शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा २०२० मध्ये सरोगसी पद्धतीने दुसऱ्या मुलाचे आई बाबा बनले. या मुलीचे नाव त्यांनी समीशा असे ठेवले आहे. या आधी त्यांना मुलगा आहे त्याचे नाव वियान आहे.
करण जोहर
करण जोहर २०१७ मध्ये सरोगसी पद्धतीने दोन मुलांचा बाबा बनला आहे. यांचा जन्म फेब्रुवारी २०१७ मध्ये झाला होता. त्यातील एकाचे नाव यश आणि दुसरीचे नाव रुही आहे.
आमिर खान-किरण राव
आमिर खान आणि किरण राव यांनी २०११ मध्ये आईवीएफ पद्धतीने मुलगा आजादच स्वागत केलं होतं. एवढेच नव्हे तर त्यांनी लोकांना आयवीएफ आणि सरोगसी पद्धतीसाठी प्रोत्साहित केलं.
शाहरुख खान आणि गौरी खान
बॉलिवूडचा किंग शाहरुख देखील एका सरोगसी मुलाचा बाप आहे. त्यांचा सगळ्यात लहान मुलगा अबराम याचा जन्म सरोगसी पद्धतीने झाला आहे.
सोहेल खान-सीमा खान
आपल्या एका दांपत्यानंतर सोहेल खान आणि सीमा खान दोघांनी अजून एका दांपत्याचा विचार केला. दुसऱ्या मुलाच्या विचाराच्या वेळी त्या दोघांनी सरोगसी किंवा आयवीएफ पद्धतीने जाण्याचा विचार केला. त्यांचा दुसरा मुलगा योहन लग्नानंतर तेरा वर्षानंतर त्यांना झाला आहे.
फराह खान
फराह खानला वयाच्या ४३ व्या वर्षी आई होता आले. तिने सरोगसी पद्धतीने वयाच्या ४३ व्या वर्षी तीन मुलांना जन्म दिला. ती या पद्धतीची खूप आभारी आहे असं म्हणते.
तुषार कपूर
अभिनेता तुषार अजूनही अविवाहित आहे. परंतु तो सिंगल पेरेन्ट आहे. त्याच्या मुलाचं नाव लक्ष आहे. लक्षच्या आयुष्यात तो आई आणि वडील दोघांचीही भूमिका निभावतो.
एकता कपूर
एकता कपूर २०१९ मध्ये सरोगसी पद्धतीने सिंगल मदर पेरेंट्स बनली. तिच्या मुलाचं नाव रवी आहे.
सनी लियोन-डेनियल वेबर
सनी लियोन आणि डेनियल वेबर त्या दोघांनाही २०१८ मध्ये सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचे आई-वडील होता आले.
श्रेयस तळपदे – दीप्ती
श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांच्या लग्नाला एकूण १४ वर्ष झाली. २०१८ मध्ये दोघांनाही सरोगसी पद्धतीने आई-वडील होता आले. त्याला एक छोटीशी मुलगी आहे तिचं नाव आद्या आहे.
लिसा रे-जेसन देहनी
अभिनेत्री लिसा रे आणि जेसन देहनी हे दोघं सरोगसी पद्धतीने २०१८ मध्ये दोन जुळ्या मुलांचे आई बाबा झाले आहेत.
हेही वाचा :