आज 25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस साजरा केला जात आहे. नाताळचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीही आपापल्या शैलीत ख्रिसमस साजरा करत आहेत. दरम्यान, आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरनेही रात्री उशिरापर्यंत कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला.
कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंबाने शनिवारी (दि. 24 डिसेंबर)ला रात्री एकत्र ख्रिसमस साजरा केला, ज्याची एक झलक आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर अंकाऊटवर शेअर केली आहे. या फोटोमध्ये आलिया (alia bhatt) बहीण शाहीन भट्टसोबत दिसत आहे. आलिया भट्टने तिच्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मेरी मेरी विथ चेरी.”
View this post on Instagram
आलियाशिवाय अभिनेत्री नीतू सिंग कपूरनेही ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, दिग्दर्शक अयान मुखर्जी, आलिया भट्टच्या बहिणी पूजा भट्ट, शाहीन भट्ट आणि आलियाची आई सोनी राजदान एकत्र दिसत आहेत. यासोबतच नीतू सिंगनेही सर्वांना ख्रिसमस 2022 च्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे, सोनी राजदानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या मुली आलिया आणि शाहीनसोबतचे काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
आलिया भट्टची आई सोनी राजदान हिने ख्रिसमस डिनरचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या दोन्ही मुली आलिया आणि शाहीन भट्ट एकत्र दिसत आहेत. त्याचवेळी, एक व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये आलिया-रणबीर व्यतिरिक्त, त्यांची मुलगी राहाच्या नावाने ख्रिसमस बॉल देखील ख्रिसमसच्या झाडावर लटकताना दिसत आहे. (bollywood christmas 2022 actress alia bhatt and actor ranbir kapoor celebrated christmas with family pictures went viral)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
डिप्रेशनमध्ये होती अभिनेत्री! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासाेबत 15 दिवस आधी झाले हाेतं ब्रेकअप, वाचा संपूर्ण किस्सा
आणखी काय हवं! मराठी अभिनेता गाजवताेय बाॅलिवूड