आली समीप लग्न घटिका! ‘स्वप्नाली’च्या हातावर रचली ‘आस्ताद’च्या नावाची मेहंदी, कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल


नवीन वर्ष सुरू झाले तसे अनेक कलाकार दोनाचे चार हात करत लग्नसारख्या गोड बंधनात अडकले. अभिज्ञा भावे-मेहुल पै, मिताली मयेकर- सिद्धार्थ चांदेकर, मानसी नाईक- प्रदीप खरेरा आदी अनेक कलाकारांनी यावर्षी लगीनगाठ बांधली आहे. या यादीत आता आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील या प्रसिद्ध जोडीची भर पडणार आहे.

आस्ताद आणि स्वप्नाली ‘व्हॅलेंटाईन डे’ चा मुहूर्त साधत लग्न करणार आहेत. या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीचा कार्यक्रम, विधींना सुरुवात झाली आहे. नुकतेच स्वप्नालीच्या घरी तिचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या कार्यक्रमातील स्वप्नालीच्या मेहंदीसोबतच तिच्या लूकचीदेखील जोरदार चर्चा सुरू आहे. मोरपंखी रंगाचा ड्रेस आणि त्यावर फुलांचे दागिने घातलेली स्वप्नाली खूपच आकर्षक दिसत आहे.

तिच्या या कार्यक्रमामध्ये काही जवळचे नातेवाईक आणि मैत्रिणींनी सहभाग घेतला होता.

आस्ताद आणि स्वप्नाली त्यांचा साग्रसंगीत लग्न सोहळा न करता कोर्ट मॅरेज करणार आहेत. या दोघांनी आणि त्यांच्या परिवाराने एकमताने हा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या काही महिन्यांनंतर ते दोघे एका मोठ्या ट्रीपवर देखील जाणार आहे. आस्ताद सध्या ‘चंद्र आहे साक्षीला’, तर स्वप्नाली ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ
-‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त अभिनेत्री अक्षरा सिंगचे नवे गाणे रिलीझ, चाहत्यांकडून मिळतोय उत्तम प्रतिसाद
-‘तोंडात पान मसाला टाकून मामींना गाणी बोलायला लावतात अध्यक्ष महोदय’, अमृता फडणवीस नवीन गाण्यावर जोरदार ट्रोल


Leave A Reply

Your email address will not be published.