Tuesday, June 18, 2024

निमृत कौरशी प्रेम की मैत्री? शिव ठाकरेंनी उघडलं गुपित; म्हणाला, ‘आमचे बंधन तर आहे…’

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त राहिलेला शाे ‘बिग बॉस 16‘चा उपविजेता शिव ठाकरे सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याला मिळत असलेले अफाट प्रेम आणि पाठिंबा या गोष्टीची साक्ष आहे की, त्याने केवळ उपविजेत्याची ट्रॉफीच नाही, तर मनेही जिंकली आहेत. शिव ठाकरेंकडे आता अनेक ऑफर्स आहेत. एकीकडे त्याने ‘खतरों के खिलाडी 13’साठी आपले नाव निश्चित केले आहे, तर दुसरीकडे त्याला एका चित्रपटाची ऑफरही आली आहे. याचा खुलासा स्वत: शिवने इन्स्टाग्राम लाईव्हवर केला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शिव ठाकरे यांनी ‘बिग बॉस 16‘ च्या प्रवासापासून निमृत कौर अहलुवालियासोबतच्या त्यांच्या नातेसंबधाबद्दल खुलासा केला आहे.

‘बिग बाॅस 16’चा विजेता एमसी स्टॅन (MS Stan) होता, तर फर्स्ट रनर अप शिव ठाकरे (shiv thakare) हाेता. या शोमध्ये शिव ठाकरे यांची निमृत आणि स्टॅनसोबतची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. अनेक चाहत्यांनी शिव आणि निमृत कौर अहलुवालियाच्या जोडीला ‘शिव्रुत’ असे नाव दिले आहे. अशात आता शिव आणि निमृत ही जोडी कायमस्वरूपी एक व्हावी, अशी जाहीर इच्छा चाहते करत आहेत.

यासंदर्भात शिव ठाकरे याने माध्यमांशी बातचीत करताना सांगितले की, “रोमँटिक बोलून होत नाही. यामुळे हृदयात घंटी वाजली पाहिजे आणि आम्ही तर घंटी हटके वाजवतो. माझ्यात आणि निम्रतमध्ये मैत्रीचं नातं आहे. जे खूप गोड आहे.  आम्ही अनेक गोष्टी भावनिकरित्या एकमेकांशी शेअर केल्या आहेत. जेव्हा माझ्या डाेळ्याला लागले हाेते, तेव्हा तिने माझी खूप काळजी घेतली हाेती. त्यामुळे आमचे बंधन तर आहे. जे खूप प्रेमळ आहे, पण गिटार वाजवणार असे नाही. जर रोमँटिक बंध असेल, तर ते एका बाजूला आणि जग दुसऱ्या बाजूला. मग मी त्याच्यासाठी काहीही करतो.”

शिव ठाकरे यांने नुकतेच इन्स्टाग्रामवर लाईव्ह दरम्यान चाहत्यांना सांगितले की, त्याला एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर देण्यात आली आहे. हा मोठा प्रोजेक्ट एक चित्रपट आहे, ज्यामध्ये बॉलीवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. (big boss 16 contestant shiv thakare reveals if he will date tv actress nimrit kaur ahluwalia )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ शुक्लाच्या आईचा व्हिडिओ झाला व्हायरल म्हणाल्या, ‘आजही लोकं माझ्यावर…’

अक्षय कुमारला भेटण्यासाठी चाहत्याने तोडले बॅरिकेडिंग, पुढे असे काही घडले जे पाहून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा