खूपच वाईट झालं! बॉलिवूडची प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर काळाच्या पडद्याआड; कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

Bollywood Famous Casting Director And Producer Seher Aly Latif Known For The Lunchbox Passes Away


मागील वर्षीप्रमाणेच २०२१ हे वर्षदेखील बॉलिवूडसाठी वाईट आहे, असंच म्हणाव लागेल. कारण या वर्षांमध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकारांनी आपला जीव गमावला आहे. त्यांची जागा कोणीही भरून काढणार नाही. अशातच आता आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘द लंचबॉक्स’ आणि ‘दुर्गामती’ या चित्रपटात आपल्या कामासाठी प्रसिद्ध असलेल्या कास्टिंग डायरेक्टर सहर अली लतीफ यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्या ४० वर्षांच्या होत्या. त्यांचे सहकारी आणि दिग्दर्शक नीरज उधवानी यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सहर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

कास्टिंग डायरेक्टरसोबतच सहर या एक प्रॉडक्शन कंपनी म्यूटेंट फिल्म्सच्या सह- संस्थापिकादेखील होत्या. सहर लतीफ स्वरा भास्कर अभिनित नेटफ्लिक्स सीरिज ‘भाग बेनी भाग’ आणि मनीषा कोइराला अभिनित ‘मस्का’ सोबतच अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग राहिल्या होत्या.

‘मस्का’ चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज उधवानी यांनी सहर अली लतीफ यांच्या निधनाची माहिती देत सांगितले की, त्यांना ८ दिवसांपूर्वी किडनी फेल झाल्यामुळे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते म्हणाले, “काही संक्रमणामुळे सहर यांची किडनी फेल झाली होती. त्यामुळे त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल केले होते. त्या औषधांवर होत्या आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. मात्र, आज त्यांना कार्डिऍक अरेस्ट झाले आणि अचानक सर्व संपले.”

सहर लतीफ यांना गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्यावरील बायोपिक ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ यांसारख्या चित्रपटात कास्टिंग डायरेक्टर म्हणून केलेल्या कामासाठी ओळखले जाते. या चित्रपटात देव पटेल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त चित्रपट निर्माते गुरिंदर चड्ढा यांच्या ‘व्हाइसरॉय हाऊस’ आणि भूमी पेडणेकर अभिनित ‘दुर्गामती’ चित्रपटातील त्यांच्या कामासाठीही ओळखले जाते. याव्यतिरिक्त सहर अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सचाही भाग राहिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.