मद्यपानामुळे अभिनेत्री गेली होती व्यसनाच्या आहारी, अनेक सुपरहिट्स देऊनही करियरचे वाजले होते तीन-तेरा


बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री पूजा भट्ट या वर्षी त्यांचा 48वा वाढदिवस साजरा करणार आहे. पूजा भट्ट कदाचित सध्या अभिनयापासून दूर असेल, पण त्यांनी बॉलिवूडमधील बर्‍याच सर्वोत्कृष्ट कलाकारांसोबत काम केले आहे. पूजा भट्ट 90 च्या दशकातील एक उत्तम अभिनेत्री होती. त्यांनी आमिर खान, संजय दत्त आणि सनी देओल या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

पूजा भट्ट यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1972 रोजी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या घरी झाला. फिल्मी कुटुंबातील पार्श्वभूमीमुळे लहानपणापासूनच त्यांना अभिनयात रस होता. याच कारणामुळे पूजा भट्टने वयाच्या 17 व्या वर्षी अभिनयास सुरवात केली. त्यांनी ‘डॅडी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सन 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर पूजा भट्टने ‘दिल है की मानता नहीं’, ‘सडक’, ‘सर’, ‘हम दोनो और चाहत’ अशा अनेक चित्रपटात भूमिका केल्या आणि प्रेक्षकांची मने जिंकली.

पूजा भट्ट यांना त्यांच्या जबरदस्त कामगिरीसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्या सिनेमांव्यतिरिक्त वैयक्तिक जीवन आणि दारूच्या व्यसनामुळे त्या बऱ्याच चर्चेत राहायच्या. एक काळ असा होता जेव्हा पूजा भट्ट खूप मद्यपान करायच्या. त्यांनी स्वतः बर्‍याच माध्यमांच्या मुलाखती आणि सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे याचा खुलासा केला आहे. परंतु, सध्या पूजा भट्टने दारूच्या व्यसनावर मात केली आहे आणि दारूला स्वतः पासून कायमचे दूर केले आहे.

पूजा भट्टला मद्यपान सोडून चार वर्षांहून अधिक काळ झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून पूजा भट्ट मद्यपान न करता आनंदी जीवन जगत आहे. अलीकडे त्यांनी सांगितले होते की, बर्‍याच वेळा त्यांना शॅम्पेनची बाटली उघडण्याची तीव्र इच्छा व्हायची. पण त्यांनी या गोष्टींना बरेच मागे सोडले आहे.

पूजा भट्टने गेल्या महिन्यात त्यांच्या व्यसनाबद्दल सोशल मीडियावर एक लांब पोस्टही लिहली होती. पूजाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “काल मला दारू पिण्याची तीव्र इच्छा होती. हे सर्व अचानक घडले. मी नेटफ्लिक्सवर दुपारी एक कार्यक्रम पाहत होते. माझा कुत्रा माझ्या पायाजवळ बसला होता आणि मी खुश होते. पण त्यानंतर मला दारू पिण्याची तीव्र इच्छा झाली. गेली 4 वर्षे मी हे केले नसताना विचार करा तेव्हा मी काय केले असेल?”

पूजाने पुढे लिहिले “मी ही भावना येऊ दिली, जर मी ते दाबण्याबद्दल विचार केला असेल तर मी त्यामध्ये अधिकच बुडाले असते. मी तिथे बसले, विचार करू लागले आणि मी वाईनची बाटली उघडली. यानंतर मी स्वत: साठी एक ड्रिंक बनवली आणि नंतर तो विचार निघून गेला. मी उठले आणि जरावेळ उन्हात बागेमध्ये फिरले. मी जोरात श्वास घेतला आणि हा क्षणही निघून गेला. मी हे म्हणत आहे, कारण एखाद्या रस्त्यावर कितीही दूर गेला असला तरी आपण परत येऊ शकतो.”

पूजा भट्ट यांनी पुढे लिहिले, “दोन वर्षे आणि दहा महिन्यांच्या विचारानंतर आता माझ्या भूतकाळाला प्रतिबिंबित करण्याची आणि आत्मसात करण्याची वेळ आली आहे. उद्या काय होईल कोणी पाहिलंय? तुम्ही सर्वजण जे तुमच्या आतल्या राक्षसाशी लढत आहात आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येशी झगडत आहात. हे लक्षात असुद्या की असे तुम्ही एकटे नाहीत. जर मी हे सोडू शकत आहे, तर तुम्हीदेखील हे करू शकता”.


Leave A Reply

Your email address will not be published.