सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील आठवणी आणि सुखदुखःच्या गोष्टी शेअर करताना दिसत असतो. यामध्ये सिनेजगतातील कलाकार सर्वात जास्त आघाडीवर असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ते नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांंशी शेअर करत असतात. काही दिवसांपासून सोशल मीडियावर सिने जगतातील कलाकारांचे बालपणीचे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या सिने जगत गाजवत असलेल्या या कलाकारांचे हे फोटो ओळखणे त्यांच्या चाहत्यांसाठीही अशक्य झालेले दिसत आहे. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे जो हिंदी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेत्रीचा असल्याचे सांगितले जात आहे. कोण आहे ती अभिनेत्री चला जाणून घेऊ.
सोशल मीडिया हे लोकांशी जोडण्याचे मोठे व्यासपीठ बनले आहे. येथे लोक आता केवळ त्यांचे विचारच नव्हे तर त्यांच्या आठवणीही शेअर करतात. यामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत आहेत. सध्या असाच एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. जो तिच्या चाहत्यांनाही ओळखणे कठीण झाले आहे. सुंदर फ्रोक घातलेली ही अभिनेत्री कोण असावी असाच प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या फोटोबद्दल आणखी एक माहिती म्हणजे या अभिनेत्रीने बिगबॉस १४ तसेच खतरोंके खिलाडीमध्येही चांगलीच गाजली होती.
https://www.instagram.com/p/CSRfwdSq2W4/?utm_source=ig_web_copy_link
तुम्हालाही अभिनेत्रीचे नाव ऐकूण चांगलाच धक्का बसेल. फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय अभिनेत्री जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) आहे, जी या फोटोमध्ये क्यूट पोज देताना दिसत आहे. जास्मिनचा हा फोटो अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा बालपणीचा हा क्यूट फोटो पाहून चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत . जस्मिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आता ती टीव्ही मालिकांव्यतिरिक्त इतर अनेक प्रोजेक्ट्समध्येही दिसत आहे. सध्या ती तिच्या पंजाबी चित्रपट ‘हनीमून’मुळे चर्चेत आहे. जस्मिन ‘हनीमून’ या चित्रपटाद्वारे पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. याशिवाय नुकताच त्याचा ‘क्या कर दिया’ म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा- पतीच्या निधनानंतर ‘या’ खास व्यक्तीने नीतूंना दिला सिनेमात कमबॅक करण्याचा सल्ला, स्वत:च केले स्पष्ट
- ‘कोणत्याही पुरस्कारापेक्षा भारीच’, अभिषेकचा ‘हा’ सिनेमा पाहून १२ कैदी बोर्डाच्या परीक्षेत पास, तिघांनी केला टॉप
- चटका लावणारी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्रीची पंख्याला लटकून आत्महत्या, वयाच्या २३व्या वर्षीच सोडले जग










