Sunday, May 19, 2024

‘सायना’तील परिणीती चोप्राचा लूक व्हायरल, चाहते म्हणाले, ‘हुबेहूब सायना दिसतीये!’

बॅडमिंटन स्टार सायना नेहवालची बायोपिक ‘सायना’ लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर समोर आला असून, यासह हा चित्रपट 26 मार्च रोजी प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. परिणीती चोप्राने चित्रपटाशी संबंधित एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अगदी सायनासारखी दिसत आहे. हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

परिणीती चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर हा कोलाज फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती अगदी सायनासारखी दिसत आहे. परिणीतीची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडल्याचे दिसून येत आहे. चाहत्यांनी कमेंट करत ‘हुबेहूब सायना दिसतीये!’ असे म्हटले आहेे.

श्रद्धा कपूरच्या जागी परिणीती चोप्राला या चित्रपटात घेतले गेले. यावर परिणीतीने काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच एक विधान केले. चित्रपटाविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ‘जेव्हा या चित्रपटासाठी तिच्याशी संपर्क साधला गेला, तेव्हा तिने कोणत्याही प्रकारचा ताण घेतला नाही.’ श्रद्धा कपूरने चित्रपट सोडला हे परिणीती चोप्रासाठी महत्त्वाचे नव्हते. या चित्रपटात दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्यासोबत काम करण्यासाठी ती खूप उत्सुक होती.

चित्रपटात अभिनेता मानव कौल सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय परेश रावलदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. निर्माता भूषण कुमारचा हा दुसरा चित्रपट आहे, ज्याच्या रिलीजची योजना आता बदलली गेली आहे.

परिणीतीपूर्वी श्रद्धा कपूरला या चित्रपटासाठी निवडले गेले होते, पण व्यस्त शेड्यूलमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला. अमोल गुप्ते दिग्दर्शित ‘सायना’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची चर्चा चालू होती. मात्र, शेवटी थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गोंडस ‘वीर’चा फोटो आला समोर; अमृता रावच्या बाळाची पहिली झलक व्हायरल!

-महिलांच्या रीप्ड जीन्सवर वक्तव्य करणं पडलं महागात! फोटो शेअर करत अभिनेत्रीची उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

-अभिनेत्री अनुष्का शर्माच्या दारावर लागली भन्नाट ‘नेम प्लेट’, तुम्हीही जाणून घ्या कारण

हे देखील वाचा